मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : लाजिरवाण्या पराभवानंतर रहाणे घेणार कठोर निर्णय, 5 खेळाडू बदलणार

IND vs AUS : लाजिरवाण्या पराभवानंतर रहाणे घेणार कठोर निर्णय, 5 खेळाडू बदलणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. यानंतर आता कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुसऱ्या टेस्टसाठी कठोर निर्णय घ्यायच्या तयारीत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. यानंतर आता कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुसऱ्या टेस्टसाठी कठोर निर्णय घ्यायच्या तयारीत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. यानंतर आता कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुसऱ्या टेस्टसाठी कठोर निर्णय घ्यायच्या तयारीत आहे.

    मेलबर्न, 21 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा डाव फक्त 36 रनवर संपुष्टात आला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर होता. ऍडलेडमध्ये झालेल्या या पराभवानंतर आता पुढचा सामना मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताचं नेतृत्व करेल. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे. पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या या पराभवानंतर अजिंक्य रहाणे दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी कठोर निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हनुमा विहारीच्या बदली रविंद्र जडेजा, ओपनिंगला केएल राहुल आणि मधल्या फळीत शुभमन गिल यांना संधी दिली जाऊ शकते. रहाणे बदलणार 5 खेळाडू पृथ्वी शॉऐवजी केएल राहुल पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सपशेल अपयशी ठरला. दोन्ही इनिंग मिळून त्याला फक्त 4 रन करता आल्या. पहिल्या इनिंगमध्ये शॉ शून्य रनवर आऊट झाला, दोन्ही इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलरनी त्याला इन स्विंग बॉलिंगवर बोल्ड केलं. आयपीएल दरम्यानही पृथ्वी शॉला संघर्ष करावा लागला होता, त्यामुळे दिल्लीच्या टीमनेही त्याला बाहेर ठेवलं होतं. आता दुसऱ्या टेस्टमध्ये शॉऐवजी केएल राहुल (KL Rahul) ओपनिंगला खेळू शकतो. केएल राहुल आणि मयंक अगरवाल या मॅचमध्ये ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे. विराटऐवजी शुभमन गिल विराट कोहली भारतात परतणार असल्यामुळे मधल्या फळीमध्ये शुभमन गिल (Shubhaman Gill) खेळेल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. विहारीऐवजी जडेजा पहिल्या टेस्टमध्ये हनुमा विहारी (Hanuma Vihari) ने निराशाजनक कामगिरी केली. तसंच टी-20 सीरिजदरम्यान दुखापतग्रस्त झालेला ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) फिट झाला आहे, त्यामुळे विहारीच्याऐवजी जडेजाला संधी देण्याचा निर्णय टीम प्रशासन घेऊ शकतं. मागच्या वर्षभरात रविंद्र जडेजा हा फॉर्ममध्ये आहे. तसंच तो बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये हनुमा विहारीपेक्षा चांगला आहे. ऋषभ पंतला संधी पहिल्या टेस्टमध्ये विकेट कीपर असलेल्या ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याची कामगिरीही निराशाजनक झाली. साहाने या मॅचमध्ये कॅचही सोडला, त्यामुळे त्याच्याऐवजी ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा विचार केला जाऊ शकतो. ऋषभ पंतने सराव सामन्यामध्ये वादळी शतक केलं होतं, तसंच मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पंतने शतकी खेळी केली होती. ऋषभ पंत कमकुवत असलेली टीम इंडियाची बॅटिंगही मजबूत करू शकतो. मोहम्मद शमीला दुखापत पहिल्या टेस्टमध्ये बॅटिंग करत असताना मोहम्मद शमी (Mohammad Shami) च्या हाताला बॉल लागला, त्यामुळे तो उरलेल्या टेस्ट मॅचमध्ये खेळू शकणार नाही, त्याच्याऐवजी रहाणेकडे मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि टी.नटराजन (T Natrajan) यांच्याऐवजी एकाला संधी देऊ शकतो.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या