मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टमध्ये धमाकेदार शतक, पण रहाणेच्या नावावर नकोसं रेकॉर्ड

IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टमध्ये धमाकेदार शतक, पण रहाणेच्या नावावर नकोसं रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी भारताला (India vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं.

  • Published by:  Shreyas

मेलबर्न, 28 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी भारताला (India vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं. रहाणेचं शतक आणि जडेजाच्या अर्धशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर 131 रनची मोठी आघाडी घेतली.

तिसऱ्या दिवसाची सुरूवात झाली तेव्हा अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा मैदानात आले, पण या दोघांनाही फार काळ मैदानात टिकता आलं नाही. टीम पेन आणि मार्नस लाबुशेन यांनी रहाणेला रन आऊट केलं. 112 रनच्या स्कोअरवर रहाणे पॅव्हेलियनमध्ये परतला.

दुसऱ्या दिवसाच्या शेवटी रहाणे 104 रनवर खेळत होता, पण यानंतर त्याला फक्त 8 रनच करता आले. आपल्या 223 बॉलमध्ये 112 रनच्या खेळीमध्ये रहाणेने 12 फोर मारले. या धमाकेदार शतकानंतरही अजिंक्य रहाणेच्या नावावर नकोसा रेकॉर्ड झाला आहे.

ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यात गोंधळ झाला होता. ज्यामुळे विराट कोहलीला विकेट गमवावी लागली होती. आता या टेस्टमध्ये जडेजा आणि रहाणेमध्ये धावताना गोंधळ पाहायला मिळाला.

32 वर्षांच्या अजिंक्य रहाणेने आपल्या टेस्ट कारकिर्दीमध्ये 66 टेस्ट खेळल्या आहेत, यामध्ये तो पहिल्यांदाच रन आऊट झाला आहे. आपल्या 111 इनिंगमध्ये रहाणेने 42.45 च्या सरासरीने आणि 49.96 च्या स्ट्राईक रेटने 4,245 रन केले, यामध्ये 12 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे.

अजिंक्य रहाणेला त्याच्या या शानदार खेळीमध्ये जीवनदानही मिळाली. 61 रनवर असताना स्टार्कच्या बॉलिंगवर स्टीव्ह स्मिथने रहाणेचा कॅच सोडला. तसंच शतक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्टार्कच्याच शॉर्ट पिच बॉलवर ट्रॅव्हिस हेडला रहाणेचा कॅच पकडता आला नाही.

या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय बॉलरनी 195 रनवर रोखलं. भारतीय टीमचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या रणनीतीचंही अनेक दिग्गजांनी कौतुक केलं. या सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 8 विकेटने दारूण पराभव झाला होता, ज्यामुळे भारत या सीरिजमध्ये 1-0 ने पिछाडीवर आहे.

First published: