IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने मानसिक खेळ खेळावे, पण आम्ही... पाहा काय म्हणाला रहाणे

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉक्सिंग डे टेस्टला मेलबर्नमध्ये सुरूवात झाली आहे. या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमचा कर्णधार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉक्सिंग डे टेस्टला मेलबर्नमध्ये सुरूवात झाली आहे. या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमचा कर्णधार आहे.

  • Share this:
    मेलबर्न, 26 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉक्सिंग डे टेस्टला मेलबर्नमध्ये सुरूवात झाली आहे. या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमचा कर्णधार आहे. या मॅचआधी अजिंक्य रहाणेने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलियाने मानसिक खेळ खेळावे, पण आमचं लक्ष्य आमच्याच टीमवर असेल, असं रहाणे म्हणाला आहे. 'भारतीय टीम दबावात असेल, तर आम्हाला आनंद होईल. विराटच्या अनुपस्थितीमध्ये टीमचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेवर अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न आम्ही करू,' असं ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर (Justin Langer) म्हणाले होते. जस्टिन लॅन्गर यांच्या या वक्तव्यावर अजिंक्य रहाणेने प्रतिक्रिया दिली. 'ऑस्ट्रेलिया मानसिक खेळ खेळण्यात प्रसिद्ध आहे, त्यांना ते करू दे. पण आम्ही मात्र आमच्याच खेळावर लक्ष्य ठेवू. आमच्या खेळाडूंना आम्ही प्रोत्साहन देऊ. भारताचं नेतृत्व करणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही एक चांगली संधी आणि जबाबदारी आहे, मी कोणताही दबाव घेऊ इच्छित नाही,' असं रहाणे म्हणाला. 'माझं काम टीमला साथ देणं आहे. लक्ष माझ्यावर नाही, तर टीमवर आहे आणि एक टीम म्हणून आम्हाला चांगलं खेळायचं आहे. आम्हाला न घाबरता खेळावं लागेल. विराटने भारतात परतण्याआधी आमच्याशी चर्चा केली. प्रत्येकाने एकमेकांसाठी खेळा, एकमेकांच्या यशाचा आनंद घ्या आणि मैदानात एकमेकांना मदत करा, असं विराटने सांगितलं', असं अजिंक्य म्हणाला. ऍडलेडमधल्या तिसऱ्या दिवसातल्या एक तासाच्या खराब खेळामुळे टीम खराब होत नाही, आम्ही दोन दिवस चांगला खेळ केला, पण एक तास खराब खेळलो आणि मॅच हरलो. आम्ही आत्मचिंतन केल्याचं रहाणेने सांगितलं. शुभमन गिल या मॅचमधून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. मयंक अगरवालसोबत तो ओपनिंगला खेळेल, अशी शक्यता आहे. 'ओपनरची भूमिका महत्त्वाची असते. मला त्यांच्यावर कोणताही दबाव टाकायचा नाही. त्यांना त्यांचा स्वाभाविक खेळण्याचं स्वातंत्र्य मी देऊ इच्छितो. सुरुवातीला पार्टनरशीप झाली, तर पुढच्या बॅट्समनसाठी गोष्टी सोप्या होतात,' असं वक्तव्य अजिंक्यने केलं.
    Published by:Shreyas
    First published: