IND vs AUS : दुसऱ्या टी-20 मध्ये स्मिथ कर्णधार का नव्हता? लॅन्गरने दिलं उत्तर

IND vs AUS : दुसऱ्या टी-20 मध्ये स्मिथ कर्णधार का नव्हता? लॅन्गरने दिलं उत्तर

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) टीममध्ये असतानाही मॅथ्यू वेड (Mathew Wade) ला कर्णधार करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर (Justin Langer) याने याचं कारण सांगितलं आहे.

  • Share this:

सिडनी, 7 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs Australia) 6 विकेटने विजय झाला. याचसोबत भारताने ही सीरिज 2-0 ने जिंकली आहे. टी-20 सीरिज जिंकत भारताने वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. मांसपेशीच्या दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर (David Warner) टी-20 सीरिजमधून बाहेर झाला, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) हादेखील फिट नसल्यामुळे खेळू शकला नाही. फिंचच्याऐवजी मॅथ्यू वेड (Mathew Wade) ला ऑस्ट्रेलियन टीमचं नेतृत्व देण्यात आलं. टीममध्ये स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) असतानाही मॅथ्यू वेडला कर्णधार का करण्यात आलं? याचं उत्तर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर (Justin Langer) यांनी दिलं आहे.

एरॉन फिंचच्या अनुपस्थितीमध्ये स्टीव्ह स्मिथला नेतृत्व दिलं जाईल, असं अनेकांना वाटलं होतं. पण टॉससाठी मॅथ्यू वेड मैदानात आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हरचा उपकर्णधार पॅट कमिन्स यालाही सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली, त्यामुळे मॅथ्यू वेडला कर्णधार करण्यात आलं.

'नेतृत्वाच्या भूमिकेसाठी स्मिथ उपयुक्त होता, कारण मागच्या काही वर्षांपासून त्याने ही जबाबदारी पार पाडली आहे. त्याच्याकडे नेतृत्व गुण आहेत. मॅथ्यू वेड उपकर्णधार आहे आणि स्मिथने मोठी याआधीही जबाबदारी भूषवली होती. जोपर्यंत तो पुन्हा कर्णधार होत नाही, तोपर्यंत आम्हाला या प्रक्रियेतून जावं लागेल. कर्णधार नसतानाही त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण दिसतात,' असं जस्टिन लॅन्गर फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला.

2018 साली दक्षिण आफ्रिकेत टेस्ट मॅचदरम्यान बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाच्या निलंबनाची तर कॅमरून बॅन्क्रॉफ्टवर 9 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, त्यावेळी स्मिथला दोन वर्षांसाठी कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं होतं. हा प्रतिबंध मार्च 2020 साली संपला होता.

Published by: Shreyas
First published: December 7, 2020, 12:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या