Home /News /sport /

IND vs AUS : पांड्याच्या फटकेबाजीपुढे ऑस्ट्रेलियाची दाणादाण, भारताचा टी-20 सीरिजवर कब्जा

IND vs AUS : पांड्याच्या फटकेबाजीपुढे ऑस्ट्रेलियाची दाणादाण, भारताचा टी-20 सीरिजवर कब्जा

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या तुफान फटकेबाजीमुळे भारताने दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia) चा पराभव केला आहे. याचसोबत भारताने वनडे सीरिजच्या पराभवाचा बदला घेतला आहे.

    सिडनी, 6 डिसेंबर : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या तुफान फटकेबाजीमुळे भारताने दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia) चा पराभव केला आहे. याचसोबत भारताने वनडे सीरिजच्या पराभवाचा बदला घेतला आहे. टी-20 सीरिजची एक मॅच बाकी असतानाच भारताने ही सीरिज 2-0ने खिशात टाकली आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 195 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. राहुल आणि शिखर धवनच्या जोडीने 5.2 ओव्हरमध्येच 56 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली, पण राहुल 22 बॉलमध्ये 30 रन करून आऊट झाला. राहुलची विकेट गेल्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी फटकेबाजी सुरूच ठेवली. शिखर धवन 36 बॉलमध्ये 52 तर विराटने 24 बॉलमध्ये 40 रन केले. हार्दिक पांड्या 22 बॉलमध्ये 42 रनवर आणि श्रेयस अय्यर 5 बॉलमध्ये 12 रनवर नाबाद राहिला. हार्दिक पांड्याने त्याच्या खेळीमध्ये 3 फोर आणि 2 सिक्स मारल्या. भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 14 रनची गरज होती, तेव्हा पांड्याने डॅनियल सॅम्सच्या बॉलिंगवर दोन सिक्स आणि दोन रन काढून भारताला जिंकवून दिलं. ऑस्ट्रेलियाकडून स्वेपसन, झम्पा आणि सॅम्स यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. त्याआधी बॉलिंगमध्ये टी. नटराजन (T Natrajan) याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली, पण ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 195 रनचं आव्हान दिलं. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 194-5 एवढा स्कोअर करून दिला. कर्णधार मॅथ्यू वेडने 32 बॉलमध्ये 58 रन तर स्टीव्ह स्मिथने 38 बॉलमध्ये 46 रनची खेळी केली. मॅक्सवेलने 13 बॉलमध्ये 22, हेनरिक्सने 18 बॉलमध्ये 26, स्टॉयनिसने 7 बॉलमध्ये 16 तर डॅनियल सॅम्सने 3 बॉलमध्ये 8 रन केले. टी नटराजन याने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल याला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारताने टीममध्ये तीन बदल केले आहेत. मोहम्मद शमी याला विश्रांती देण्यात आली आहे, त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूरची निवड झाली आहे, तर मनिष पांडेच्या कोपराला दुखापत झाली आहे, म्हणून श्रेयस अय्यर टीममध्ये आला आहे. मागच्या मॅचवेळी दुखापत झालेला रविंद्र जडेजा आधीच टी-20 सीरिजमधून बाहेर झाला होता, त्याच्याऐवजी युझवेंद्र चहल खेळणार आहे. पहिल्या टी-20 मध्ये बॅटिंग करत असताना जडेजाला दुखापत झाल्यामुळे चहल कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात उतरला होता. त्या मॅचमध्ये तीन विकेट घेत चहल मॅन ऑफ द मॅचही ठरला होता. पहिल्या टी-20 मध्ये भारताचा 11 रनने विजय झाला होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेही टीममध्ये बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच फिट नसल्यामुळे मॅथ्यू वेडकडे नेतृत्व देण्यात आलं आहे. फिंच, हेजलवूड, स्टार्क यांच्याऐवजी सॅम्स, स्टॉयनिस आणि एन्ड्र्यू टाय यांची निवड करण्यात आली. भारतीय टीम केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, टी नटराजन, युझवेंद्र चहल ऑस्ट्रेलियन टीम डीआरसी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉईसेस हेनरिक्स, मॅथ्यू वेड, डॅनियल सॅम्स, सीन एबॉट, मिचेल स्वीपसन, एडम झम्पा, एन्ड्र्यू टाय
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या