मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : धवनने मोडला धोनीचा रेकॉर्ड, रोहित-विराटनंतर हा विक्रम करणारा तिसरा भारतीय

IND vs AUS : धवनने मोडला धोनीचा रेकॉर्ड, रोहित-विराटनंतर हा विक्रम करणारा तिसरा भारतीय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) दुसऱ्या टी-20 मध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) याने एमएस धोनी (MS Dhoni) ला मागे टाकलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) दुसऱ्या टी-20 मध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) याने एमएस धोनी (MS Dhoni) ला मागे टाकलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) दुसऱ्या टी-20 मध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) याने एमएस धोनी (MS Dhoni) ला मागे टाकलं आहे.

    सिडनी, 7 डिसेंबर : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan)ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये 36 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. धवनसोबतच हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने 22 बॉलमध्ये 42 रनची नाबाद खेळी करून भारताला 6 विकेटने जिंकवून दिलं. शिखरने केएल राहुलसोबत ओपनिंगला 56 रनची पार्टनरशीप केली, यानंतर विराटसोबत त्याने 39 रन केले. या इनिंगमध्ये धवनने एमएस धोनी (MS Dhoni) यालाही मागे टाकलं आहे. शिखर धवन आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या या यादीत धवन 24 व्या क्रमांकावर गेला आहे. धवनने 63 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 1,641 रन केले आहेत. तर यावर्षी ऑगस्ट महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने 98 टी-20 मॅचमध्ये 1,617 रन केले होते. दुसऱ्या मॅचआधी धवन धोनीपासून 29 रन मागे होता. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट पहिल्या आणि रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 84 टी-20 मॅचमध्ये 2,843 रन केले आहेत, तर रोहितने 108 टी-20 मॅचमध्ये 2,773 रन केले आहेत. यानंतर मार्टिन गप्टीलने 91 मॅचमध्ये 2,575 रन केले. या यादीमध्ये पाकिस्तानचा शोएब मलिक चौथ्या क्रमांकावर आहे. मलिकने 116 टी-20 मॅचमध्ये 2,335 रन केले. पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन आहे. मॉर्गनने 97 मॅचमध्ये 2,278 रन केले आहेत. याआधी कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्ये शिखर धवन फक्त एक रन करून आऊट झाला होता. टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळख असलेल्या धवनने 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टी-20 टीममधून त्याला अनेकवेळा बाहेर ठेवण्यात आलं. 2014 आणि 2016 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये धवन टीममध्ये नव्हता. पण आयपीएलच्या 13 व्या मोसमात धवनने खोऱ्याने रन काढल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी टी-20 मंगळवार 8 डिसेंबरला होणार आहे. भारताने ही सीरिज आधीच जिंकली असली तरी ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. टी-20 सीरिज संपल्यानंतर 17 डिसेंबरपासून चार टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या