मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : स्टम्पमागून मॅथ्यू वेड धवनला म्हणाला, मी धोनी नाही

IND vs AUS : स्टम्पमागून मॅथ्यू वेड धवनला म्हणाला, मी धोनी नाही

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs Australia) 6 विकेटने विजय झाला. या मॅचमध्ये मॅथ्यू वेड (Mathew Wade) आपण धोनी नसल्याचं शिखर धवन (Shikhar Dhawan) ला म्हणाला.

  • Published by:  Shreyas
सिडनी, 7 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs Australia) 6 विकेटने विजय झाला. याचसोबत भारताने टी-20 सीरिजही जिंकली. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 195 रनचा पाठलाग भारताने 19.4 ओव्हरमध्ये केला. शिखर धवनचं अर्धशतक आणि हार्दिक पांड्या, विराट कोहलीच्या फटकेबाजीमुळे भारताने हा सामना जिंकला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विकेट कीपर मॅथ्यू वेड याने शिखर धवनचा स्टम्पिंग सोडला, त्यानंतर आपण धोनी नाही, असं तो म्हणाला. स्टम्प मायक्रोफोनमध्ये हा आवाज कैद झाला. वेडच्या या वक्तव्यानंतर शिखर धवन आणि कॉमेंटेटरही हसायला लागले. सगळेच विकेट कीपर स्टम्पमागे धोनीच्या गतीने प्रभावित झालेले अनेकवेळा पाहायला मिळाले. यावेळी वेडनेही आपण धोनीइतके जलद नसल्याचं मान्य केलं. नवव्या ओव्हरमध्ये स्वीपसनच्या बॉलिंगवर धवन स्टम्पिंग होता होता वाचला. स्वीपसनने टाकलेल्या वाईड बॉलवर धवनने कट मारण्याचा प्रयत्न केला, पण धवनचा अंदाज चुकला आणि बॉल विकेट कीपर मॅथ्यू वेडच्या हातात गेला. या काही क्षणांच्या काळात धवनचा पाय हवेत गेला होता, पण वेडला बेल्स उडवायला वेळ लागला, ज्यामुळे शिखर धवन वाचला. यानंतर वेड आपण धोनीएवढे जलद नसल्याचं वेड म्हणाला. धवनने या मॅचमध्ये 36 बॉलमध्ये 52 रन केले, यामध्ये 4 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. तर हार्दिक पांड्याने 22 बॉलमध्ये नाबाद 42 रन केले.
First published:

पुढील बातम्या