मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : हार्दिक पांड्या म्हणतो, मी नाही तर हा खेळाडू खरा 'मॅन ऑफ द मॅच'

IND vs AUS : हार्दिक पांड्या म्हणतो, मी नाही तर हा खेळाडू खरा 'मॅन ऑफ द मॅच'

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा विजय झाला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला, पण पांड्याने विजयाचं श्रेय नटराजन ( T. Natrajan) याला दिलं.

  • Published by:  Shreyas
सिडनी, 7 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा विजय झाला, याचसोबत भारताने टी-20 सीरिजही खिशात टाकली. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. पांड्याने 22 बॉलमध्ये नाबाद 42 रन करत भारताला जिंकवून दिलं. विराट कोहली (Virat Kohli) ची विकेट गेल्यानंतर भारतीय टीम अडचणीत आली होती. पण पांड्याने फटकेबाजी करत भारताला 6 विकेटने विजय मिळवून दिला. या कामगिरीबद्दल हार्दिक पांड्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. पण खरा मॅन ऑफ द मॅच मी नाही तर टी नटराजन (T.Natrajan) आहे, अशी प्रतिक्रिया हार्दिकने दिली. जिकडे सगळ्या बॉलरवर बॅट्समन आक्रमण करत होते, तिकडे नटराजनने 5 च्या इकोनॉमी रेटने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 2 विकेट घेतल्या. नटराजन याने त्याच्या बॉलिंगमध्ये 10-15 रन कमी दिल्या, याचाच शेवटी फरक पडला, त्यामुळे नटराजन यालाच मॅन ऑफ द मॅच मिळायला पाहिजे होतं, असं हार्दिक पांड्या मॅच संपल्यानंतर म्हणाला. 'माझा खेळ माझ्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे. ज्या मॅचमध्ये आम्ही मोठ्या आव्हानाचा पाठलाग केला आहे, त्या मॅच माझ्या लक्षात राहतात. मी स्कोअरबोर्ड बघून बॅटिंग करतो. त्यामुळे कोणत्या बॉलरला लक्ष्य करायचं आहे, ते तुम्हाला कळतं. या परिस्थितीमधून मी अनेकवेळा गेलो आहे. मागच्या चुकांमधून बराच शिकलो आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमने चांगली बॅटिंग केली. भारताचे बॉलर अडचणीमध्ये होते, पण नटराजन याने उत्कृष्ठ बॉलिंग केली,' अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने दिली.
First published:

पुढील बातम्या