विराट आणि अय्यर यांच्यामध्ये 93 रनची पार्टनरशीप झाली होती. हे दोघंही ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरतील, असं वाटत असतानाच स्मिथने ही अफलातून कामगिरी केली. त्याआधी शिखर धवन 30 रनवर आणि मयंक अग्रवाल 28 रनवर आऊट झाले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. स्मिथने 64 बॉलमध्ये 104 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या पाचही बॅट्समननी अर्धशतकापेक्षा जास्त स्कोअर केला, त्यामुळे भारताला 390 रनचं मोठं आव्हान मिळालं. स्मिथचं भारताविरुद्ध वनडेमधलं हे पाचवं शतक होतं. याआधी पहिल्या मॅचमध्येही स्मिथने शतक केलं होतं.What a screamer of a catch by Steve Smith to get rid of Shreyas Iyer! #AUSvINDpic.twitter.com/VjOLpjcdak
— ICC (@ICC) November 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.