Home /News /sport /

IND vs AUS : ...त्यांच्या अनुपस्थितीमध्येही टीम इंडियाचा विजय, सचिनची कौतुकाची थाप!

IND vs AUS : ...त्यांच्या अनुपस्थितीमध्येही टीम इंडियाचा विजय, सचिनची कौतुकाची थाप!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दणदणीत विजय झाला आहे. यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने भारतीय टीमचं अभिनंदन केलं आहे.

    मुंबई, 29 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दणदणीत विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या इनिंगमध्ये दिलेलं 70 रनचं आव्हान भारताने 2 विकेट गमावून पूर्ण केलं. याचसोबत भारताने सीरिजमध्येही धमाकेदार पुनरागमन केलं. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. 36 रनमध्येच भारतीय टीम ऑल आऊट झाली होती. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर होता. ऍडलेडमधल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताने मेलबर्नमध्ये केलेल्या पुनरागमनाचं कौतुक करण्यात येत आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही या विजयाबाबत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. 'विराट, रोहित, इशांत आणि शमीच्या अनुपस्थितीमध्ये भारताने मिळवलेला हा विजय उत्कृष्ट आहे. पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय टीमने दाखवलेली जिगर वाखणण्याजोगी आहे,' असं ट्विट सचिनने केलं आहे. पितृत्वाच्या रजेमुळे विराट कोहली पहिली टेस्ट संपल्यानंतर भारतात परतला, तर पहिल्याच टेस्टमध्ये मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. रोहित शर्माही दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजून खेळू शकलेला नाही. अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मा हादेखील दुखापतीमुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाऊ शकला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी टेस्ट 7-11 जानेवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे. ही टेस्ट सिडनीमध्ये होणार का नाही याबाबत साशंकता आहे, कारण सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत, त्यामुळे तिसरी टेस्टही मेलबर्नमध्येच खेळवली जाण्याची शक्यता आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या