IND vs AUS : ब्रिस्बेन टेस्टआधी ऑस्ट्रेलियाला आठवली सचिनची 30 वर्षांपूर्वीची इनिंग

IND vs AUS : ब्रिस्बेन टेस्टआधी ऑस्ट्रेलियाला आठवली सचिनची 30 वर्षांपूर्वीची इनिंग

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या चौथ्या आणि अखेरच्या टेस्टला 15 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या टेस्ट मॅचआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ची 30 वर्षांपूर्वीची इनिंग आठवली आहे.

  • Share this:

ब्रिस्बेन, 13 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या चौथ्या आणि अखेरच्या टेस्टला 15 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या टेस्ट मॅचआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ची 30 वर्षांपूर्वीची इनिंग आठवली आहे. ब्रिस्बेनच्या याच मैदानात सचिन ऑस्ट्रेलियातल्या भूमीतली त्याची पहिली टेस्ट मॅच खेळला होता. या मॅचमधल्या सचिनच्या बॅटिंगचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे.

29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये झालेल्या या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा 10 विकेटने विजय झाला होता. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला उतरलेला सचिन 16 रन करून व्हिटनीच्या बॉलिंगवर बोल्ड झाला होता, तर दुसऱ्या इनिंगमध्ये सचिनला 7 रन करता आले होते.

2020-2021 च्या या टेस्ट सीरिजच्या 3 मॅच झाल्या आहेत आणि सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. पहिली टेस्ट मॅच ऍडलेडमध्ये, दुसरी मेलबर्नमध्ये तर तिसरी सिडनीमध्ये खेळवली गेली. ऍडलेडमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला, यानंतर मेलबर्नमधली टेस्ट भारताने 8 विकेटने जिंकली. तर सिडनी टेस्टच्या शेवटच्या दिवशी शानदार कामगिरी करत भारताने तिसरी टेस्ट ड्रॉ केली. आता चौथी टेस्ट जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरतील.

First published: January 13, 2021, 9:36 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading