मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : रोहितची एनसीएमध्ये वजन कमी करण्यासाठी कसरत, शेयर केले PHOTO

IND vs AUS : रोहितची एनसीएमध्ये वजन कमी करण्यासाठी कसरत, शेयर केले PHOTO

भारताचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये उपचार घेत आहे. 11 डिसेंबरला रोहित शर्माची फिटनेस टेस्ट होणार आहे. ही फिटनेस टेस्ट पास झाली तरच रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या (India vs Australia) टेस्ट सीरिजमध्ये जाऊ शकतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
बंगळुरू, 8 डिसेंबर : भारताचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये उपचार घेत आहे. 11 डिसेंबरला रोहित शर्माची फिटनेस टेस्ट होणार आहे. ही फिटनेस टेस्ट पास झाली तरच रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या (India vs Australia) टेस्ट सीरिजमध्ये जाऊ शकतो. आयपीएल (IPL 2020)दरम्यान रोहित शर्माच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला वनडे आणि टी-20 टीममधून वगळण्यात आलं होतं. आता रोहितच्या सुरुवातीच्या दोन टेस्ट मॅच खेळण्यावरही संशय निर्माण झाला आहे. 11 तारखेची फिटनेस टेस्ट रोहित पास झाला, तर तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, पण तिकडे गेल्यानंतर त्याला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्यामुळे तो सुरुवातीच्या दोन टेस्ट मॅचना मुकेल. रोहित शर्मा हा सध्या एनसीएमध्ये डबल मेहनत करत आहे. मांडीच्या दुखापतीवर उपचार घेत असतानाच रोहित वजन कमी करण्यासाठीही घाम गाळत आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार भविष्यात छोटीही दुखापत होऊ नये, यासाठी रोहित त्याचं वजन कमी करत आहे. रविवारी रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेयर केले. या फोटोमध्ये रोहित आयपीएलच्या तुलनते बारिक दिसत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीमचे फिजियो जोपर्यंत क्लीन चीट देत नाहीत, तोपर्यंत कोणताही खेळाडूल हाय लेव्हल फिटनेस टेस्ट देऊ शकत नाहीत. पण जर खेळाडूच्या शरिराच्या खालच्या भागावर उपचार सुरू असतील, तर तो खेळाडू आपल्या वजनावर काम करू शकतो. कमी वजन असलेल्या शरिरामुळे मांसपेशीवर कमी तणाव येतो. मागच्यावर्षी रोहित शर्मा दुखापतींमुळे त्रस्त होता, त्यामुळे तो आता कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. फिटनेसवर अनेक कारणांमुळे तो लक्ष देऊ शकला नाही. आता मात्र फिट होण्यासाठी आणि लागोपाठ क्रिकेट खेळण्यासाठी रोहित भरपूर मेहनत घेत आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.
First published:

पुढील बातम्या