Home /News /sport /

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टआधी रोहित शर्माबाबत महत्त्वाची बातमी

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टआधी रोहित शर्माबाबत महत्त्वाची बातमी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये भारतीय टीम (India vs Australia) ला ओपनरनी चांगली सुरुवात करून दिली नाही. पण आता तिसऱ्या टेस्टआधी भारतीय टीमसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीमचा स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) 30 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी भारतीय टीमसोबत जोडला जाईल.

पुढे वाचा ...
    मेलबर्न, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये भारतीय टीम (India vs Australia) ला ओपनरनी चांगली सुरुवात करून दिली नाही. पण आता तिसऱ्या टेस्टआधी भारतीय टीमसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीमचा स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) 30 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी भारतीय टीमसोबत जोडला जाईल. आयपीएलदरम्यान दुखापत झाल्यामुळे रोहित एनसीएमध्ये उपचार घेत होता. यानंतर तो 16 डिसेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला. सध्या तो सिडनीमध्ये 14 दिवस क्वारंटाईनचा कालावधी संपवत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितला बुधवारी मेलबर्नला पाठवलं जाईल आणि तिसऱ्या टेस्टमध्ये तो ओपनर म्हणून खेळेल. तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार रोहित 30 डिसेंबरला टीम इंडियाच्या बायोबबलमध्ये जाईल. रोहितला सिडनीवरून मेलबर्नला पाठवण्यात येणार असल्यामुळे तिसरी टेस्ट मॅच मेलबर्नमध्येच होण्याची शक्यता जास्त आहे. वेळापत्रकानुसार तिसरी टेस्ट सिडनीमध्ये होणार आहे, पण गेल्या काही दिवसांपासून सिडनीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असल्यामुळे आधीपासूनच या टेस्टवर संकटाचे ढग दाटले होते. त्यामुळे मेलबर्नमध्येच तिसरी टेस्टही खेळवली जाईल, अशी शक्यता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बोलून दाखवली होती. 7 जानेवारी ते 11 जानेवारीदरम्यान तिसरी टेस्ट खेळवली जाणार आहे. भारताची खराब ओपनिंग पहिल्या टेस्टमध्ये पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल तर दुसऱ्या टेस्टमध्ये शुभमन गिल आणि मयंक अगरवाल ओपनिंगला आले. ऍडलेड टेस्टमध्ये पृथ्वी शॉला दोन्ही इनिंग मिळून 4 रन केले. तर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये मयंक शून्य रनवर आऊट झाला. रोहित शर्मा टीममध्ये आल्यामुळे भारताच्या ओपनिंगचा प्रश्न सुटू शकतो. मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजपासून रोहित टेस्टमध्ये ओपनिंगला खेळायला लागला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या