IND vs AUS : तिसऱ्या टेस्टआधी हिटमॅन मैदानात! रोहितने सुरू केला सराव
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाची (India vs Australia) नजर आता सिडनी टेस्टवर आहे. बॉक्सिंग डे टेस्टमधल्या विजयानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे, त्यातच आता भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरला आहे.
मेलबर्न, 31 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाची (India vs Australia) नजर आता सिडनी टेस्टवर आहे. बॉक्सिंग डे टेस्टमधल्या विजयानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे, त्यातच आता भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरला आहे. बुधवारी क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर रोहित टीममध्ये दाखल झाला, त्यानंतर आता रोहितने सरावालाही सुरूवात केली आहे. आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहितला वनडे, टी-20 आणि टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन मॅच खेळता आल्या नव्हत्या.
सिडनी टेस्टसाठी रोहित शर्माने सरावाला सुरूवात केली आहे. बीसीसीआयने रोहित शर्माचे फोटो शेयर केले आहेत, यामध्ये तो फिल्डिंग प्रॅक्टिस करताना दिसत आहे. इंजिन सुरू झालं आहे, आता पुढे काय होणार हे दिसतच आहे, असं कॅप्शन बीसीसीआयने या ट्विटला दिलं आहे.
पहिल्या दोन टेस्टमध्ये मयंक अगरवाल आणि हनुमा विहारी अपयशी ठरले, त्यामुळे या दोघांपैकी एकाला बाहेर ठेवून रोहित शर्माला संधी मिळू शकते. 7 जानेवारीपासून तिसऱ्या टेस्टला सुरूवात होणार आहे.