Home /News /sport /

IND vs AUS : 'हिटमॅन'ची टीम इंडियामध्ये एन्ट्री, असं झालं रोहित शर्माचं स्वागत

IND vs AUS : 'हिटमॅन'ची टीम इंडियामध्ये एन्ट्री, असं झालं रोहित शर्माचं स्वागत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम (India vs Australia)साठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) टीममध्ये दाखल झाला आहे.

    मेलबर्न, 30 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम (India vs Australia)साठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) टीममध्ये दाखल झाला आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रोहित शर्मा टीममध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ शेयर केला आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार रोहित? रोहित शर्मा किती फिट आहे, ते पाहावं लागेल. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्याला कसं वाटत आहे, ते पाहूनच निर्णय घेतला जाईल, असं भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी स्पष्ट केलं. रोहितच्या दुखापतीचा वाद आयपीएलदरम्यान रोहित शर्माच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली, त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती. आयपीएलच्या काही मॅच विश्रांती घेतल्यानंतर रोहित पुन्हा एकदा मैदानात उतरला. आयपीएलसाठी फिट असलेला रोहित टीम इंडियासाठी फिट कसा नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. आयपीएलच्या फायनलमध्ये रोहित शर्माने धमाकेदार अर्धशतक करत मुंबईला पाचव्यांदा आयपीएल जिंकवून दिली होती. विराटचं धक्कादायक वक्तव्य ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरूवातीलाच रोहित शर्माबाबत विराट कोहलीला विचारण्यात आलं, तेव्हा रोहितच्या फिटनेसबाबत आपल्याला काहीच माहिती देण्यात आली नाही. आयपीएल खेळल्यामुळे रोहित आमच्यासोबत येईल, असं वाटलं होतं, या सगळ्या प्रक्रियेत संवादाचा अभाव असल्याचं विराट म्हणाला, त्यामुळे हा वाद आणखी वाढला. अखेर विराटच्या या वक्तव्यानंतर बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रक काढत रोहितच्या फिटनेसविषयी माहिती दिली. रोहित फिट झाला तर त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं. रोहित एनसीएमध्ये आयपीएलदरम्यान दुखापत झाल्यानंतर रोहित शर्मा भारतात परतला. बंगळुरूच्या एनसीएमध्ये जाऊन त्याने उपचार घेतले. एनसीएने पूर्णपणे फिट घोषित केल्यानंतर रोहितला ऑस्ट्रेलियाला जायची परवानगी मिळाली. ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर तिथल्या कोरोना नियमांमुळे रोहितला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं. त्यानंतर आता रोहित टीम इंडियामध्ये दाखल झाला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या