India vs Australia : IPL खेळणं रोहित शर्माला पडणार महागात, 'या' कारणामुळे कसोटी मालिकेला मुकणार?

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडिया अडचणीत, रोहित आणि इशांत शर्मा कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडिया अडचणीत, रोहित आणि इशांत शर्मा कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, या दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. रोहित आणि इशांत यांची कसोटी संघासाठी निवड करण्यात आली होती, मात्र दोन्ही खेळाडू 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी फिट होणार नसल्याचं समोर आलं आहे. आयपीएल (IPL 2020) दरम्यान मुंबई (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्मा आणि दिल्ली (Delhi Capitals) चा जलद गोलंदाजइशांत शर्मा (Ishant Sharma) यांना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे इशांत शर्मा आयपीएलमधून बाहेर झाला होता, तर रोहित चार सामन्यात विश्रांती घेऊन पुन्हा खेळला होता. या दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती, पण नंतर वाद झाल्यावर रोहितला टेस्ट टीममध्ये निवडण्यात आलं. मात्र आता रोहित 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी दौऱ्यासाठी फिट होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा-37 वर्षांनंतर भारत पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचणार 'तो' विक्रम इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, रोहितच्या फिटनेसविषयी अद्याप बीसीसीआयला कोणतीही माहिती मिळाली नाही आहे. तर इशांत शर्माची दुखापत अजूनही बरी झाली नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाइन राहणं बंधनकारक असल्यामुळे, 1 डिसेंबरआधीच दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावे लागेल. मात्र दोघांच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही आहे. वाचा-जागा 1 फलंदाज 3! ऑस्ट्रेलियावरुद्ध शिखर धवनसोबत कोणाला उतरवणार विराट? याआधी रवी शास्त्रींनीही व्यक्त केली चिंता रोहित आणि इशांत शर्माला पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावं लागेल, अन्यथा त्यांचं खेळणं कठीण होईल, अशी भीती रवी शास्त्रींनी व्यक्त केली. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार एबीसी स्पोर्ट्सशी बोलताना शास्त्री म्हणाले, 'आपला फिटनेस सिद्ध करण्यासाठी रोहितला एनसीएमध्ये काही टेस्ट द्यावा लागतील. तेव्हाच त्याला फिट व्हायला किती वेळ लागेल, ते कळेल. रोहितला तिकडे जास्त वेळ लागला, तर मात्र गोष्टी कठीण होतील. यानंतर क्वारंटाईनही बघावं लागेल. जर तो टेस्ट सीरिजसाठी शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलियात पोहोचला, तर त्याचं खेळणं कठीण होईल.' रोहितची वनडे आणि टी-20 सीरिजसाठी रोहितची निवड न होण्यावरही शास्त्रींनी भाष्य केलं. रोहितला किती आराम द्यायची गरज आहे, हे पाहणंही गरजेचं आहे. कोणत्याही खेळाडूला जास्त वेळ आराम देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी दिली.
    Published by:Priyanka Gawde
    First published: