मेलबर्न, 2 जानेवारी : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हॉटेलमध्ये जाणं टीम इंडियाच्या (India vs Australia) पाच खेळाडूंना चांगलंच महागात पडलं आहे. या पाचही खेळाडूंचे हॉटेलमध्ये जेवायचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
बीसीसीआय (BCCI) ने भारतीय खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नव्या वर्षी टीम इंडियाचे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवण करताना दिसले. त्यामुळे खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉलचं उल्लंघन करताना दिसले.
India Test vice-captain Rohit Sharma among those isolated; investigation to determine if it's breach of bio-security protocol: CA
— Press Trust of India (@PTI_News) January 2, 2021
Five Indian players — Rohit Sharma, Rishabh Pant, Shubman Gill, Prithvi Shaw & Navdeep Saini placed in isolation after video emerged on social media of group appearing to eat at an indoor venue in Melbourne.Potential breach of COVID protocols being investigated: Cricket Australia
— ANI (@ANI) January 2, 2021
भारतीय खेळाडूंनी चेडस्टन शॉपिंग सेंटरच्या बारबीक्यू रेस्टॉरंटमध्ये जेवत होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी टीम इंडियाचे खेळाडू जेवायला आल्याचं सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना मान्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे दोन्ही खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. खेळाडूंना बाहेर जाऊन खाण्याची परवानगी असली तरी त्यांना हॉटेलच्या आत नाही तर बाहेर बसावं लागेल, असा नियम करण्यात आला आहे. पण या फोटोंमध्ये टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलच्या आतमध्ये बसून जेवताना दिसत आहेत.
Bc mere saamne waale table par gill pant sharma saini fuckkkkkk pic.twitter.com/yQUvdu3shF
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
Bhookh nai h so ye order kar diya h taaki inko dekhta rahu pic.twitter.com/cvr3Cfhtl7
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
They are not aware but i have paid there table bill :) . Least i can do for my superstars pic.twitter.com/roZgQyNBDX
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
हॉटेलमध्ये गेल्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांने त्यांचं संपूर्ण बिल भरलं. भारतीय खेळाडूंनी हॉटेलमध्ये सॉय सॉस चिकन, चिकन मशरूम आणि डाएट कोक प्यायलं, याचं बिल 118.69 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 6,683 भारतीय रुपये झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.