IND vs AUS : मॅच सुरू असतानाच ऋषभ पंतला आठवला 'स्पायडरमॅन', पाहा मैदानात काय झालं

IND vs AUS : मॅच सुरू असतानाच ऋषभ पंतला आठवला 'स्पायडरमॅन', पाहा मैदानात काय झालं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs Australia) ऐतिहासिक विजय झाला आहे. याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) ही 2-1 ने खिशात टाकली.

  • Share this:

ब्रिस्बेन, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs Australia) ऐतिहासिक विजय झाला आहे. याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) ही 2-1 ने खिशात टाकली. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला ऋषभ पंत (Rishabh Pant). पंतच्या नाबाद 89 रनच्या खेळीमुळे भारताने 328 रनचं आव्हान शेवटचे काही बॉल बाकी असताना पूर्ण केलं. ऋषभ पंतच्या या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

या मॅचनंतर ऋषभ पंत याचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे. काही जणांनी तर ऋषभ पंत याने याच मॅचदरम्यान विकेट कीपिंग करत असतानाचा एक व्हिडिओही शेयर केला आहे. ऋषभ पंत याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमना मॅचदरम्यान स्लेजिंग काही नवीन नाही. विरोधी टीमचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी खेळाडू स्लेजिंगचा वापर करत असतात. ऋषभ पंतही यात मागे नाही.

स्टम्पमागे आपण ऋषभ पंतला (Rishabh Pant) अनेकदा प्रतिस्पर्धी बॅट्समनशी बोलताना किंवा बॉलरला मार्गदर्शन करताना पाहतो. स्टम्पमागे चर्चेचा किंवा बोलण्याचा आवाज स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड होतो. चौथ्या टेस्ट मॅचदरम्यानही ऋषभ पंत गाणं गात असतानाचा आवाजही स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेटकरी यावरुन पंतला ट्रोल करत आहेत. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत 'स्पायडरमॅन स्पायडरमॅन, तुने चुराया मेरा दिल का चैन' हे गाणं गात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टिम पेन (Tim Paine) आणि कॅमरुन ग्रीन(Cameron Green) बॅटिंग करताना दिसत आहेत.

2018-19 च्या दौऱ्यावेळी देखील रिषभ पंत आणि टीम पेनमध्येही शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. परंतु त्यावेळी ऋषभने आपल्या बॅटने पेन बरोबरच सर्वांना प्रत्युत्तर दिले होते. याचबरोबर प्रतिस्पर्धी बॅट्समनचा संयम तुटण्यासाठी ऋषभ पंत अनेकवेळा नवनव्या आयडियाचा वापर करत असतो.

First published: January 19, 2021, 5:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या