मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : भारताच्या आणखी दोन खेळाडूंना दुखापत, रहाणेची चिंता वाढली

IND vs AUS : भारताच्या आणखी दोन खेळाडूंना दुखापत, रहाणेची चिंता वाढली

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs Australia) दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना दुखापत झाली आहे.

सिडनी, 9 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs Australia) दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऋद्धीमान साहा ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्याऐवजी विकेट कीपिंगसाठी मैदानात आला. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पंतला दुखापत झाली होती. यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं आहे. पॅट कमिन्सने टाकलेल्या बॉलवर खेळताना पंतल्या कोपराला दुखापत झाली. यानंतर टीम इंडियाचा फिजियोथेरपिस्ट मैदानात आला आणि त्याने पंतवर प्राथमिक उपचार केले.

फिजियोच्या उपचारांनंतर पंतने पुन्हा बॅटिंगलाही सुरूवात केली. पण या दुखापतीनंतर त्याची लय गेली. 67 बॉलमध्ये 36 रन करून पंत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने पुजारासोबत अर्धशतकीय पार्टनरशीप केली होती. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा 244 रनवर ऑल आऊट झाला.

ऋषभ पंत याच्यानंतर रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) ही दुखापत झाली. बॅटिंग करत असताना मिचेल स्टार्कने टाकलेला बॉल जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला. दुखापतीनंतर जडेजानेही पंतप्रमाणेच बॅटिंग सुरू ठेवली. 37 बॉलमध्ये 28 रन करून जडेजा नाबाद राहिला. पण इनिंग संपल्यानंतर त्यालाही स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं आहे. जडेजा जर या मॅचमध्ये खेळला नाही, तर तो टीमसाठी मोठा धक्का असेल. कारण पहिल्या इनिंगमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट घेतल्या होत्या. तसंच जबरदस्त फिल्डिंग करत स्मिथला रन आऊट केलं होतं.

या दौऱ्यामध्ये टीम इंडियाच्या बऱ्याच खेळाडूंना दुखापत झाली. मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तीनही खेळाडू दुखापतीमुळे दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत.

First published: