लॉकडाऊनमध्ये वाढलं वजन, पंतने मागच्या 4 महिन्यात केलं इतकं कमी!

लॉकडाऊनमध्ये वाढलं वजन, पंतने मागच्या 4 महिन्यात केलं इतकं कमी!

भारताचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याने मागच्या काही महिन्यांत त्याचं वजन 10 किलोंनी कमी केलं आहे. ऋषभ पंतचे लहानपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा (Tarak Sinha) यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी : भारताचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याने मागच्या काही महिन्यांत त्याचं वजन 10 किलोंनी कमी केलं आहे. ऋषभ पंतचे लहानपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा (Tarak Sinha) यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. कोरोना व्हायरसच्या काळामध्ये क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत आयपीएल (IPL 2020) खेळण्यासाठी युएईला गेला होता. आयपीएलच्या 13 व्या मोसमात दिल्लीकडून खेळताना त्याला खास कामगिरी करता आली नाही. पंतच्या खराब फॉर्मचं कारण त्याचं वाढलेलं वजन असल्याची टीकाही अनेकांनी केली.

द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणाऱ्या तारक सिन्हा यांनी ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत माहिती दिली. लॉकडाऊनदरम्यान पंतकडे घरी ट्रेनिंगची सुविधा नव्हती, त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय खेळाडूनं जेवढं फिट असावं, तेव्हढा नव्हता. पण यानंतर मात्र त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं आणि शरिरातील चरबी कमी केली, असं सिन्हा म्हणाले.

तारक सिन्हा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. 'लॉकडाऊनमध्ये पंत रुडकीच्या त्याच्या घरी अडकला होता. भारतीय खेळाडूला ट्रेनिंगसाठी ज्या गोष्टींची गरज आहे, त्यादेखील पंतला तिकडे मिळत नव्हत्या. त्यामुळे त्याचं वजन वाढलं. पण युएईमध्ये गेल्यानंतर आयपीएलदरम्यान त्याने खूप मेहनत केली,' अशी प्रतिक्रिया सिन्हा यांनी दिली.

तारक सिन्हा यांनी आकाश चोप्रा आणि शिखर धवन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही प्रशिक्षण दिलं होतं. मी ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत अजिबात चिंतेत नव्हतो. पण यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाला, ज्याचा परिणाम त्याच्या बॅटिंगवर झाला, असं सिन्हा म्हणाले.

ऋषभ पंतने आयपीएलच्या 2020 सालच्या मोसमात 113.95 च्या स्ट्राईक रेटने आणि 31.18 च्या सरासरीने 14 मॅचमध्ये 343 रन केले. आयपीएलच्या मागच्या मोसमात पंतने फक्त एक अर्धशतक केलं. तो स्वत:ही आयपीएलमधल्या त्याच्या कामगिरीमुळे नाराज होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी टेस्टमध्ये पंतने 118 बॉलमध्ये 97 रनची खेळी केली, ज्यामुळे तारक सिन्हा समाधानी आहेत. 'तो पुन्हा एकदा फिट होईल, असा विश्वास मला होता. पण त्याला बॅट्समन म्हणूनही परत यायचं होतं. तो अति-सावध झाला होता. आयपीएलमध्ये रक्षात्मक मानसिकतेमधून तो खेळला. त्याची विकेट कीपिंगही फिटनेस आणि आत्मविश्वासाने सुधारेल. लहानपणी जसा खेळायचा तसाच खेळ आणि आनंदी राहा, असं त्याला आम्ही सांगितलं होतं. मागच्या दोन महिन्यांमध्ये तो चांगल्या मूडमध्ये आहे,' असं सिन्हा म्हणाले.

Published by: Shreyas
First published: January 13, 2021, 12:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading