IND vs AUS : जडेजाने इतिहास घडवला! कोहली-धोनीनंतर हे रेकॉर्ड करणारा तिसरा भारतीय

मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 8 विकेटने पराभव केला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारताच्या या विजयाचे शिल्पकार होते.

मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 8 विकेटने पराभव केला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारताच्या या विजयाचे शिल्पकार होते.

  • Share this:
    मेलबर्न, 30 डिसेंबर : मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 8 विकेटने पराभव केला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारताच्या या विजयाचे शिल्पकार होते. पहिल्या इनिंगमध्ये 57 रन करणाऱ्या जडेजाने या मॅचमध्ये तीन विकेट घेतल्या. त्याने अजिंक्य रहाणेसोबत 121 रनची पार्टनरशीप केली, ज्यामुळे भारताला पहिल्या इनिंगमध्ये 131 रनची मोठी आघाडी मिळाली. जडेजाची ही 50 वी टेस्ट मॅच होती. जडेजा हा विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) नंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे. 'माही भाई आणि विराटसोबत या यादीमध्ये येणं सन्मानाची गोष्ट आहे. बीसीसीआय, माझे सहकारी आणि सपोर्ट स्टाफ यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल धन्यवाद. भविष्यातही असाच विश्वास दाखवा, जय हिंद,' असं ट्विट जडेजाने केलं. जडेजाची कारकीर्द 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जडेजाने आतापर्यंत 50 टेस्ट, 50 टी-20 आणि 168 वनडे खेळल्या आहेत. त्याने टेस्टमध्ये 216, वनडेमध्ये 188 आणि टी20 मध्ये 39 विकेट घेतल्या आहेत, याचसोबत त्याने टेस्टमध्ये 1926, वनडेमध्ये 2411 आणि टी-20 मध्ये 217 रन केले आहेत. रवी शास्त्रींनी केलं जडेजाचं कौतुक टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही रविंद्र जडेजाचं कौतुक केलं आहे. जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये तज्ज्ञ बॅट्समन म्हणून खेळू शकतो. तो ऑलराऊंडर असल्यामुळे टीममध्ये आहे. परिस्थितीनुसार तो सहाव्या क्रमांकावर बॅटिंग आणि पाचवा बॉलर म्हणून खेळू शकतो. जडेजामुळे टीमला संतुलन मिळतं, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्री यांनी दिली. परदेशात खेळताना एखाद्या फास्ट बॉलरला दुखापत व्हायची भीती असते, उमेश यादवच्या बाबतीतही तसंच झालं. जडेजा असल्यामुळे टीमला संतुलन मिळालं. जडेजा-अश्विनसोबत बॉलिंग केल्यामुळे फास्ट बॉलरला दिलासा मिळतो.
    Published by:Shreyas
    First published: