Home /News /sport /

IND vs AUS : रवी शास्त्रीपासून लांब राहा, जडेजाला मिळाला सल्ला

IND vs AUS : रवी शास्त्रीपासून लांब राहा, जडेजाला मिळाला सल्ला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतीमुळे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला दोन टी-20 आणि एक टेस्ट मॅच (India vs Australia) खेळता आलेली नाही. काही दिवस मैदानापासून लांब असलेल्या रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला, यानंतर त्याला चाहत्यांनी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला.

पुढे वाचा ...
    मेलबर्न, 22 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतीमुळे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला दोन टी-20 आणि एक टेस्ट मॅच (India vs Australia) खेळता आलेली नाही. काही दिवस मैदानापासून लांब असलेल्या रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला, यानंतर त्याला चाहत्यांनी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला. रविंद्र जडेजाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तो कॉफी पित आहे. या फोटोला त्याने दिलेलं कॅप्शनही गमतीशीर आहे. 'कॉफी, कारण वाईन पिण्यासाठी ही वेळ लवकरची आहे,' असं जडेजा म्हणाला. यानंतर त्याला चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली, तसंच भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यापासून लांब राहायलाही जडेजाला सांगण्यात आलं. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये खेळणार जडेजा? रविंद्र जडेजा पहिल्या टी-20 मॅचदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. जडेजाच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो शेवटच्या दोन टी-20 मॅचमध्ये खेळला नव्हता. तसंच पहिल्या टेस्टलाही त्याला मुकावं लागलं होतं. दुसऱ्या टेस्टसाठी जडेजा फिट झाला, तर हनुमा विहारीऐवजी त्याला संधी दिली जाऊ शकते. जडेजा चांगला बॉलर असल्यासोबतच सहाव्या क्रमांकावर उपयुक्त बॅटिंगही करू शकतो. जडेजाचा अनुभवही टीम इंडियाच्या कामाला येऊ शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार जडेजा मोठा स्पेल टाकण्यासाठी फिट झाला, तर मग त्याला संधी मिळेल. तसंच मेलबर्नमध्ये भारताला पाच बॉल घेऊन खेळण्याचीही संधी मिळेल. जडेजाने 49 टेस्टमध्ये 35 च्या सरासरीने 1,869 रन केले, यामध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मागच्या दौऱ्यात जडेजाने अर्धशतकं केली होती. तर दुसरीकडे हनुमा विहारीने 10 टेस्टमध्ये 576 रन केले आहेत. विहारीने वेस्ट इंडिजविरुद्ध एक शतक केलं, तसंच त्याच्या नावावर 4 अर्धशतकांचाही समावेश आहे. टेस्टमध्ये हनुमा विहारीची सरासरी 33 एवढी आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या