IND vs AUS : ...आणि रवी शास्त्रींच्या डोळ्यात अश्रू आले

IND vs AUS : ...आणि रवी शास्त्रींच्या डोळ्यात अश्रू आले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) ऐतिहासिक विजय झाला. शेवटच्या दिवसाच्या खेळाचे काही बॉल बाकी असताना भारताने विजय मिळवत सीरिज खिशात टाकली. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

ब्रिस्बेन, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) ऐतिहासिक विजय झाला. शेवटच्या दिवसाच्या खेळाचे काही बॉल बाकी असताना भारताने विजय मिळवत सीरिज खिशात टाकली. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातला हा सलग दुसरा टेस्ट सीरिज विजय आहे. याआधी 2018-19 सालीही भारताने कांगारूंना त्यांच्याच मायभूमीत पराभूत केलं होतं. या दोन्ही विजयावेळी भारतीय टीमसोबत असलेल्या प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'36 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर अशाप्रकारे पुनरागमन करणं अशक्य होतं. कोरोना आणि दुखापतींमुळे हा दौरा सगळ्यात कठीण होता. शेवटची टेस्ट सुरू झाली, तेव्हा आमच्याकडे कोणतेही पर्याय नव्हते. जे खेळाडू उपलब्ध आहेत, त्यांच्याबरोबरच आम्हाला खेळावं लागलं,' असं रवी शास्त्री म्हणाले.

'अजिंक्य रहाणेने शांतता आणि संयम दाखवला. एका रात्रीत घडलेल्या या गोष्टी नाहीत. 5 वर्ष आम्ही टीमची बांधणी करत आहोत. विराट इकडे नसला, तरीही त्याचंही कौतुक केलं पाहिजे. या विजयानंतर माझ्याही डोळ्यात अश्रू आले,' अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी दिली. ऋषभ पंतची स्टाईल तुम्ही कधीही बदलू शकत नाही, तो नेहमी आव्हानाचा पाठलाग करायला जातो, असं म्हणत शास्त्रींनी त्याचं कौतुक केलं.

शुभमन गिल, ऋषभ पंत यांची आक्रमक खेळी तसंच चेतेश्वर पुजाराने दाखवलेला संयम याच्या जोरावर भारताने ब्रिस्बेनमधली चौथी टेस्ट जिंकली. शुभमन गिलने 91 रन तर ऋषभ पंतने नाबाद 89 रन केले. चेतेश्वर पुजारा 211 बॉलमध्ये 56 रन करून आऊट झाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीमला दुखापतींमुळे 20 खेळाडू बदलावे लागले. विराट कोहली पितृत्वाच्या रजेमुळे पहिली टेस्ट खेळून भारतात परतला. तर मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल, हनुमा विहारी या खेळाडूंना दुखापत झाली. ईशांत शर्माही दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाऊ शकला नाही. तर रोहित शर्माही दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टपासून उपलब्ध झाला.

Published by: Shreyas
First published: January 19, 2021, 4:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या