IND vs AUS : टीम इंडियाच्या 9 खेळाडूंना दुखापत, सोशल मीडियावर रवी शास्त्री ट्रोल

IND vs AUS : टीम इंडियाच्या 9 खेळाडूंना दुखापत, सोशल मीडियावर रवी शास्त्री ट्रोल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs Australia) दुखापतींनी ग्रासलं आहे. ऍडलेड टेस्ट सुरू व्हायच्या आधीपासून सुरू झालेल्या दुखापती आता शेवटची टेस्ट आली तरी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

  • Share this:

ब्रिस्बेन, 13 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs Australia) दुखापतींनी ग्रासलं आहे. ऍडलेड टेस्ट सुरू व्हायच्या आधीपासून सुरू झालेल्या दुखापती आता शेवटची टेस्ट आली तरी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मयंक अगरवाल आणि रवीचंद्रन अश्विन यांना दुखापत झाली आहे. त्याआधी इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकले नाहीत. भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्यामुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल केलं जात आहे.

बुमराहसह हे भारतीय खेळाडू बाहेर

पोटाला दुखापत झाल्यामुळे बुमराह चौथ्या टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. तर शमी, उमेश यादव, जडेजा आणि विहारी आधीच सीरिजमधून बाहेर झाले आहेत. याशिवाय ऋषभ पंत आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या दुखापतीवरही टीम इंडियाचं लक्ष असेल. मयंक अगरवाल हादेखील सराव करत असताना दुखापतग्रस्त झाला. केएल राहुल यालाही सराव करताना दुखापत झाल्यामुळे तो भारतात परतला आहे. जर मयंकची दुखापत जास्त गंभीर नसेल, तर हनुमा विहारीच्या ऐवजी तो मैदानात उतरेल.

बुमराह शेवटच्या टेस्टमधून बाहेर झाल्यामुळे नटराजनला पदार्पण करण्याची संधी मिळेल. तर रवींद्र जडेजाच्याऐवजी शार्दुल ठाकूर किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाची टीममध्ये वर्णी लागेल

भारताची संभाव्य टीम

शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, टी नटराजन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज

Published by: Shreyas
First published: January 13, 2021, 1:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading