Home /News /sport /

IND vs AUS : राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाला जाणार? राजीव शुक्लांनी दिलं उत्तर

IND vs AUS : राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाला जाणार? राजीव शुक्लांनी दिलं उत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) लाजीरवाणा पराभव झाला. फक्त 36 रनवर भारताचा ऑल आऊट झाला. यानंतरराहुल द्रविड (Rahul Dravid) याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात यावं, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

    मुंबई, 22 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) लाजीरवाणा पराभव झाला. फक्त 36 रनवर भारताचा ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर होता. यानंतर टीम इंडियावर चौफेर टीका होऊ लागली आहे. तसंच राहुल द्रविड (Rahul Dravid) याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात यावं, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या मागणीवर आयपीएल (IPL) चे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहुल द्रविडला पाठवलं जाणार नसल्याचं राजीव शुक्ला यांनी स्पष्ट तेलं आहे. भारताच्या खराब कामगिरीनंतर दिलीप वेंगसरकर यांनी राहुल द्रविडला टीम इंडियाची मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात यावं, अशी मागणी केली होती. पण असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा घेण्यात येणार नाही, असं राजीव शुक्ला म्हणाले. बीसीसीआय नाराज बीसीसीआय टीम इंडियाच्या या कामगिरीवर नाराज आहे. आम्ही खुश नाही, हा चांगला स्कोअर नव्हता. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह याबाबत चिंतित आहेत आणि दोघंही काही योजनांवर काम करत आहेत, त्यामुळे टीमची कामगिरी सुधारेल. ते दोघंही टीम प्रशासनाच्या संपर्कात आहेत. पुढच्या टेस्टमध्ये टीमची कामगिरी चांगली होईल, असं वक्तव्य राजीव शुक्ला यांनी केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौरा कायमच कठीण राहिला आहे. याआधी झालेल्या मॅच बघितल्या तरी तिकडे ऑस्ट्रेलियाच्या बॉलरना खेळणं मुश्किल असतं. पण आता भारतीय बॅट्समन चांगली बॅटिंग करत आहेत आणि ऑस्ट्रेलियात रन बनवत आहेत. विराट कोहलीची कमी दुसऱ्या टेस्टमध्ये नक्कीच जाणवेल, पण टीममध्ये दुसरे चांगले खेळाडू आहेत, ते नक्कीच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास राजीव शुक्लांनी व्यक्त केला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या