'ऑस्ट्रेलियातला विजय माझ्यामुळे नाही तर...'द्रविडने पुन्हा दाखवला मनाचा मोठेपणा

'ऑस्ट्रेलियातला विजय माझ्यामुळे नाही तर...'द्रविडने पुन्हा दाखवला मनाचा मोठेपणा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवून भारतीय टीमने (India vs Australia) इतिहास घडवला आहे. या विजयानंतर क्रिकेट चाहते भारताचा माजी क्रिकेटपटू आणि एनसीए प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) ला सलाम करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवून भारतीय टीमने (India vs Australia) इतिहास घडवला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये भारताने सीरिज जिंकल्यामुळे या विजयाला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. शुभमन गिल, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारख्या खेळाडूंनी या विजयात मोलाची भूमिका बजावली. या विजयानंतर क्रिकेट चाहते भारताचा माजी क्रिकेटपटू आणि एनसीए प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) ला सलाम करत आहेत. या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करण्याचं काम द्रविडने केलं आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयावर राहुल द्रविडनेही प्रतिक्रिया दिली आहे.

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला मिळालेल्या विजयाचं श्रेय कारण नसताना मला दिलं जात आहे, मुलांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असं द्रविड इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला आहे. द्रविडने जरी या विजयाचं श्रेय घ्यायला नकार दिला असला, तरी ऋषभ पंत, हनुमा विहारी आणि शुभमन गिल या खेळाडूंनी द्रविडमुळे आपल्याला यश मिळालं, असं अनेकवेळा सांगितलं आहे.

हे ही वाचा- ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन म्हणतो, 'माझं टेस्ट करियर संपलं'

टीम इंडियाचे माजी निवड समिती सदस्य जतीन परांजपे यांनीही राहुल द्रविडचं कौतुक केलं आहे. सध्या टीममध्ये असलेल्या युवा खेळाडूंच्या यशात राहुल द्रविडचा मोठा वाटा आहे, त्याने मुलांना महत्त्वाच्या टिप्स दिल्या, ज्यामुळे त्यांचा खेळण्याचा स्तर सुधारला. राहुलने खेळाडूंचा पाया भक्कम केला, यानंतर ते रवी शास्त्रीकडे गेले, असं परांजपे इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले.

'या दौऱ्यांआधी द्रविड भारतीय टीमचा सपोर्ट स्टाफ, इंडिया ए आणि अंडर-19 टीम, निवड समिती यांच्याशी चर्चा करायचा. कोणत्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित करा, हे द्रविड त्यांना सांगायचा. इंडिया-ए टीममध्ये रणजी ट्रॉफीतल्या कामगिरीला महत्त्व दिलं जायचं. मयंक अगरवाल आणि हनुमा विहारी यांना तिकडूनच टीममध्ये एन्ट्री मिळाली. ए टीमला राहुल द्रविडसारखा प्रशिक्षक मिळाला, तर यापेक्षा चांगलं काय असू शकेल,' असं वक्तव्य परांजपे यांनी केलं.

Published by: Shreyas
First published: January 25, 2021, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या