Home /News /sport /

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवण्यासाठी द्रविड-कुंबळेने सांगितली रणनीती

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवण्यासाठी द्रविड-कुंबळेने सांगितली रणनीती

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील टेस्ट सीरिजला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि महान बॅट्समन राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी भारताला रणनीती सांगितली आहे.

पुढे वाचा ...
सिडनी, 11 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील टेस्ट सीरिजला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. याआधी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. याचाच भाग म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातल्या दुसऱ्या सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. वनडे सीरिजमधील पराभवानंतर टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवत भारताने टेस्ट सीरिजसाठी आपले मनोबल वाढवले आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकणं सोपी गोष्ट नाही. भारताने (Team India) दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात खेळताना ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली होती. महत्त्वाचं म्हणजे 71 वर्षात पहिल्यांदाच भारताला ऑस्ट्रेलियात (Australia) टेस्ट सीरीज जिंकता आली होती. पण या दौऱ्यामध्ये टीम इंडियाला अशी कामगिरी पुन्हा करता येणार का नाही, याविषयी भारताच्या दोन माजी खेळाडूंनी मत मांडले आहे. दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि महान बॅट्समन राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी एका वेबिनारमध्ये (Webinar) यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भारतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये 17 डिसेंबरला पहिली टेस्ट खेळवण्यात येणार आहे. ॲडलेडमध्ये ही टेस्ट खेळवण्यात येणार असून या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा दबदबा आहे. या ठिकाणी खेळलेल्या 20 टेस्टपैकी 14 मध्ये त्यांना विजय मिळाला आहे. मागील दौऱ्यात झालेल्या टेस्टमध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या टेस्टमध्ये भारताचे पारडे थोडे जड आहे. 2003 मध्ये टीम इंडियाने या मैदानावर मिळवलेल्या विजयात राहुल द्रविडचा मोलाचा वाटा होता. त्याने या टेस्टमध्ये 233 आणि नाबाद 72 रनची खेळी केली होती. कुंबळेची रणनीती काय ? या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवल्यास भारतीय टीमचं मनोबल वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर पुढील काही मॅचमध्ये भारताला उत्तम कामगिरी करण्यास मदत होईल. मागील दौऱ्यात ऑस्ट्रलियान टीममध्ये नसलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचा यावेळी टीममध्ये समावेश आहे. त्यामुळे भारताला या दोघांना आउट करणे महत्त्वाचे ठरणार आहे. टीम इंडियामध्ये प्रतिभावान खेळाडू असून विराट कोहली ३ टेस्ट मॅच खेळणार नाही. पण बाकीची टीम दमदार असल्याचे देखील कुंबळे यावेळी म्हणाला. द्रविडने देखील टीम इंडियाच्या यशस्वी होण्यासाठी काही गणिते मांडली आहेत. काय म्हणाला द्रविड ? राहुल द्रविडने यावेळी चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) कौतुक करताना या दौऱ्यात पुजारासारखी दमदार बॅटिंग करणाऱ्या खेळाडूची भारताला गरज आहे. मागील सीरिजमध्ये पुजाराने 500 रन केले होते. त्यामुळे टीममधील एखाद्या खेळाडूला पुजारासारखी बॅटिंग करावी लागणार आहे. विराट कोहली संपूर्ण सिरीज खेळणार नसल्याने दुसऱ्या खेळाडूला ही जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याचे देखील यावेळी द्रविड म्हणाला. त्याचबरोबर भारतीय बॉलरचं कौतुक करत त्यांच्याकडे सामन्यात 20 विकेट घेण्याची क्षमता असल्याचा विश्वास देखील द्रविडने व्यक्त केला.
First published:

पुढील बातम्या