IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाचं भविष्य वर्तवणाऱ्या 5 खेळाडूंची अश्विनने केली बोलती बंद!

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाचं भविष्य वर्तवणाऱ्या 5 खेळाडूंची अश्विनने केली बोलती बंद!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) रोमांचक आणि ऐतिहासिक असा विजय झाला आहे. सीरिज जिंकल्यानंतर भारताचा ऑफ स्पिनर रवी अश्विन (R Ashwin) याने टीकाकारांची बोलती बंद केली आहे.

  • Share this:

ब्रिस्बेन, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) रोमांचक आणि ऐतिहासिक असा विजय झाला आहे. 328 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने शेवटच्या दिवशी अवघे काही बॉल शिल्लक असताना केला. या विजयासोबतच भारताने टेस्ट सीरिजही 2-1 ने जिंकली आहे. सीरिज जिंकल्यानंतर भारताचा ऑफ स्पिनर रवी अश्विन (R Ashwin) याने टीकाकारांची बोलती बंद केली आहे. अश्विन याने दोन फोटो ट्विट केले आहेत, यातल्या एका फोटोमध्ये भारताच्या पराभवाची भविष्यवाणी करणारे 5 खेळाडू आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये टीम इंडियाचा ट्रॉफीसोबतचा फोटो आहे.

LHS (Left Hand Side) ही RHS (Right Hand Side) सारखी नाही, असा टोला अश्विनने ट्विटरवरून हाणला आहे. मागच्या 4 आठवड्यांमध्ये मिळालेल्या पाठिंब्यामुळे भारावलो असल्याची प्रतिक्रिया अश्विनने दिली आहे. अश्विनने ट्विट केलेल्या फोटोमध्ये मायकल क्लार्क, रिकी पॉण्टिंग, मायकल वॉ, मायकल वॉन आणि ब्रॅड हॅडिन यांचे फोटो आणि त्यांची वक्तव्य आहेत.

काय म्हणाले होते खेळाडू?

'विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीम खेळणार असल्याचा विचारही मी करू शकत नाही, ते अडचणीत आहेत', असं मायकल क्लार्क म्हणाला होता. तर विराटच्या अनुपस्थितीमध्ये भारताला व्हाईटवॉश करण्याची संधी आहे. 36 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर पडलेल्या भारतीय टीमला उठवायलाही कोणी नाहीये, असं रिकी पॉण्टिंग म्हणाला होता.

ऑस्ट्रेलिया ही सीरिज 4-0 ने जिंकेल, अशी भविष्यवाणी मायकल वॉने ऍडलेड टेस्ट झाल्यानंतर केली होती. भारताचा टेस्ट सीरिजमध्ये दारूण पराभव होईल, हे मी सांगितलं होतं. ऑस्ट्रेलिया 4-0 ने जिंकेल, असं मायकल वॉन म्हणाला होता. तर ब्रॅड हॅडिननेही भारताच्या पराभवाचं भाकित वर्तवलं होतं. भारताला ऍडलेडमध्येच विजयाची संधी होती, यानंतर त्यांचा विजय होईल, असं वाटत नाही, असं हॅडिन म्हणाला होता.

सिडनी टेस्टमध्ये भारताचा पराभव होईल, असं वाटत होतं, पण हनुमा विहारी आणि आर.अश्विन यांनी दुखापत झालेली असतानाही किल्ला लढवला आणि ती मॅच ड्रॉ केली. सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी विहारीच्या मांडीचा स्नायू दुखावला होता, त्यामुळे त्याला धावताही येत नव्हतं, तर अश्विनची कंबर दुखत होती. या दुखापतीमुळे दोघंही ब्रिस्बेनची चौथी टेस्ट खेळू शकले नाहीत.

Published by: Shreyas
First published: January 19, 2021, 3:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या