IND vs AUS : मैदानात संघर्ष करणाऱ्या पृथ्वी शॉचं टीकाकारांना प्रत्युत्तर

IND vs AUS : मैदानात संघर्ष करणाऱ्या पृथ्वी शॉचं टीकाकारांना प्रत्युत्तर

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अपयशी ठरला, यानंतर त्याच्यावर चौफेर टीका झाली.

  • Share this:

ऍडलेड, 21 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अपयशी ठरला, यानंतर त्याच्यावर चौफेर टीका झाली. या टीकाकारांना पृथ्वी शॉ याने प्रत्युत्तर दिलं आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शॉ बोल्ड झाला. या मॅचमध्ये त्याला एकूण 4 रनच करता आले. या कामगिरीनंतर पृथ्वी शॉच्या तंत्रावर अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिल याला संधी मिळू शकते.

पृथ्वी शॉ याचं प्रत्युत्तर

आयपीएल 2020 (IPL 2020) पासूनच पृथ्वी शॉ मैदानात संघर्ष करत आहे, त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. 'जर तुम्ही करणाऱ्या कामावर दुसरी व्यक्ती टीका करत असेल, तर याचा अर्थ ती व्यक्ती ते काम करू शकत नाही, पण तुम्ही करू शकता,' असं इन्स्टाग्राम स्टेटस पृथ्वी शॉ याने ठेवलं आहे.

दोन्ही इनिंगमध्ये बोल्ड

पृथ्वी शॉ याला इनस्विंग बॉलसमोर खेळताना अडचणी येत आहेत. बॅट आणि पॅडच्यामध्ये अंतर राहिल्यामुळे पृथ्वी शॉ बोल्ड होत आहे. ऍडलेड टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्येही तो अशाच पद्धतीने आऊट झाला. भारताने या टेस्ट मॅचमध्ये केएल राहुल आणि शुभमन गिलच्याऐवजी पृथ्वी शॉ याला संधी दिली. पहिल्या इनिंगमध्ये तो दुसऱ्या बॉलवर एकही रन न करता आऊट झाला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 4 रन करता आले. पहिले मिचेल स्टार्क आणि मग पॅट कमिन्सने इन स्विंग बॉलवर शॉला बोल्ड केलं.

आयपीएलमध्येही निराशा

आयपीएल 2020 मध्ये दिल्लीकडून खेळताना पृथ्वी शॉ याने धमाकेदार सुरूवात केली, पण नंतर तो अपयशी ठरला. काही मॅचसाठी पृथ्वी शॉ याला बाहेरही ठेवण्यात आलं होतं. सराव सामन्यात पृथ्वी शॉ याची बॅट शांतच राहिली. आता 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये शॉ ऐवजी शुभमन गिलला संधी मिळू शकते.

Published by: Shreyas
First published: December 21, 2020, 9:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या