Home /News /sport /

IND vs AUS : सराव सामन्यात विराट-पुजाराशिवाय भारत मैदानात, ओपनर पुन्हा अपयशी

IND vs AUS : सराव सामन्यात विराट-पुजाराशिवाय भारत मैदानात, ओपनर पुन्हा अपयशी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी (India vs Australia) भारतीय टीमच्या दुसऱ्या सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. पण या मॅचमध्येही भारताचे ओपनर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अपयशी ठरले.

    सिडनी, 11 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी (India vs Australia) भारतीय टीमच्या दुसऱ्या सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. तीन दिवसांच्या या डे-नाईट मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलिया एविरुद्ध टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे, पण या मॅचमध्येही भारताचे ओपनर अपयशी ठरले. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) फक्त 2 रन करून आऊट झाला, तर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने 40 रन केले. या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना विश्रांती देण्यात आली आहे. ऍडलेडमध्ये 17 डिसेंबरपासून पहिली टेस्ट सुरू होणार आहे. या मॅचआधी हा सराव सामना महत्त्वाचा मानला जात आहे. मयंकचा फ्लॉप शो मयंक अग्रवाल वनडे सीरिजमध्येही अपयशी ठरला. सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या दोन मॅचमध्ये त्याला फक्त 22 आणि 28 रनच करता आले. आयपीएलमध्ये मात्र मयंकने धमाकेदार कामगिरी केली होती. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच मयंक अग्रवालने पदापण केलं होतं. त्यावेळी मयंकने 3 इनिंगमध्ये 65 च्या सरासरीने 195 रन केले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये मयंक 25 च्या सरासरीने खेळला. टेस्ट मॅचमध्ये द्विशतक करणारा मयंक लवकर फॉर्ममध्ये यावा, अशी कर्णधार विराट कोहलीची अपेक्षा असेल. दुसरीकडे पृथ्वी शॉ यानेही पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. पृथ्वीने भारताला आक्रमक सुरूवात करून दिली, तरी तो 40 रन करून माघारी परतला. 29 बॉलमध्येच शॉने 40 रन केले, यामध्ये 8 फोरचा समावेश होता. चांगल्या सुरुवातीनंतरही पृथ्वीला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यातही पृथ्वी शॉला चमकदार कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या इनिंगमध्ये तो शून्यवर आऊट झाला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 19 रन करता आले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पृथ्वी शॉने 25 पेक्षा कमीच्या सरासरीने रन केल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या