मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलजवळ विमान अपघात

IND vs AUS : टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलजवळ विमान अपघात

भारतीय क्रिकेट टीम (Team India) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पोहोचली आहे. सिडनीमध्ये भारतीय खेळाडू क्वारंटाईन कालावधी घालवत आहेत. टीम इंडियाचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तिकडून जवळच एक विमान अपघात झाला आहे.

  • Published by:  Shreyas
सिडनी : भारतीय क्रिकेट टीम (Team India) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पोहोचली आहे. सिडनीमध्ये भारतीय खेळाडू क्वारंटाईन कालावधी घालवत आहेत. टीम इंडियाचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तिकडून 30 किमी जवळ विमान अपघात झाला आहे. या अपघातामध्ये काही स्थानिक क्रिकेटपटू आणि फूटबॉलपटू थोडक्यात बचावले आहेत. मैदानामध्ये विमान कोसळल्यानंतर खेळत असलेल्या खेळाडूंनी तिकडून पळ काढला. सिडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये क्रिकेट आणि फूटबॉलच्या मॅच सुरू होत्या. पार्कमधल्या शेडपासून काही अंतरावरच हे विमान येऊन कोसळलं. या शेडमध्ये जवळपास 12 खेळाडू बसले होते. विमान पडत असल्याचं दिसताच खेळाडूंनी तिकडून पळ काढला. 'विमान जवळ येत असल्याचं लक्षात येताच मी पळा, पळा असं ओरडलो. यानंतर सगळे त्या ठिकाणहून पळाले,' असं क्रॉमर क्रिकेट क्लबचे उपाध्यक्ष ग्रेग रोलिन्स म्हणाले. 'विमान दिसताच मी किंचाळायला लागले. विमानाच्या पायलटने शेडच्या बाजूने विमान नेलं. शेडवर विमान पडलं असतं, तर 12 जणांचा मृत्यू झाला असता,' असं स्कॉट मॅनिंग नाईन नेटवर्कशी बोलताना म्हणाला. स्कॉटचे वडिल आणि त्याची गर्लफ्रेंड शेडमध्ये होते. विमानात असलेले दोघेही जण फ्लायिंग स्कूलचे असल्याचं सांगण्यात येत आहे. हवेतच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. विमानात असलेल्या दोघाही जणांना दुखापत झाली आहे.
First published:

पुढील बातम्या