सिडनी, 30 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सुरू असलेल्या वन डे सामन्यापैकी 3 सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. सामन्याची धमाकेदार सुरुवात करणारा डेव्हिड वॉर्नर हा शेवटच्या वन डे सोबतच टी-20 सामना देखील खेळणार नाही. डेव्हिडला दुखापत झाल्यामुळे तो पुढचे सामने खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 3 सामन्यांवर एकहाती विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे.
चौथ्या ओव्हरमध्ये शिखर धवननं मारलेला बॉल रोखण्यासाठी वॉर्नर जात असताना त्याच्या डाव्या पायाला मोठी दुखापत झाली. मैदानात वॉर्नरला खूप वेदना होऊ लागल्या. सीरिजमधून जर वॉर्नर बाहेर झाला तर ऑस्ट्रेलिया संघासाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. दुसर्या वनडे सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 77 चेंडूंत 83 धावांचे शानदार डाव खेळला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वॉर्नरने 76 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त त्याने गेल्या वर्षी पिंक बॉल टेस्टमध्ये 355 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
हे वाचा-IND vs AUS : श्रेयस अय्यरचा भन्नाट थ्रो, वॉर्नर थेट पॅव्हेलियनमध्येच गेला
ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या म्हणण्यानुसार वॉर्नरला दुखापत झाल्यामुळे वन डे बरोबरच टी-20 सामन्यात तो खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंचने सामना संपल्यानंतर याबाबत माहिती दिली. वन डे मालिकेच्या शेवटच्या सामन्यासाठी नवीन खेळाडू शोधावा लागणार आहे. डेव्हिडला दोन सामन्यांमध्ये दुखापत झाल्यामुळे पुढच्या सामन्यासाठी खेळता येणार नाही. वॉर्नर ठीक झाल्यावर लवकरच परत येईल अशी त्यांना आशा आहे, परंतु वॉर्नरला मैदानावर खूप वेदना होत असल्याचेही त्याने सांगितले. पुढच्या सामन्यांमध्ये संघाला वॉर्नरविना खेळावं लागेल असंही संघाच्या कर्णधारानं यावेळी सांगितलं.