Home /News /sport /

IND vs AUS: टीम इंडियावर पुन्हा एकदा मुंबईचं वर्चस्व! तीन प्रमुख स्थानांवर मुंबईकर

IND vs AUS: टीम इंडियावर पुन्हा एकदा मुंबईचं वर्चस्व! तीन प्रमुख स्थानांवर मुंबईकर

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) शुक्रवारी रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

    मुंबई, 1 जानेवारी :  भारतीय क्रिकेटची (India Cricket) पंढरी अशी मुंबईची (Mumbai) ओळख आहे. एकेकाळी टीम इंडियाची निम्मी टीम ही मुंबईची असे. भारतीय टीमपेक्षा मुंबईच्या टीममध्ये निवड होणं  अवघड मानलं जात असे. कालांतरानं भारतीय क्रिकेटचा अन्य शहरांमध्ये विस्तार झाला. महेंद्रसिंह धोनीपासून (MS Dhoni) प्रेरणा घेत भारतीय टीममध्ये (Team India) अनेक छोट्या शहरांमधील खेळाडू  दाखल झाले. त्यामुळे टीममधील मुंबईकरांचं प्रमाण कमी झालं. आता पुन्हा मुंबईकरांकडं नेतृत्व भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) शुक्रवारी रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी विराट कोहली पहिल्या टेस्टनंतर भारतामध्ये परतल्यानंतर अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) कर्णधार म्हणून तर चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता पुजाराच्या जागी रोहितची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. BCCI नं ही नियुक्ती जाहीर करताच कर्णधार अजिंक्य रहाणे, उपकर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) या टीमच्या तिन्ही मुख्य जबाबदाऱ्या आता मुंबईकरांकडं आल्या आहेत. भारतीय टीमचा कर्णधार, उपकर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक हे तिघंही मुंबईकर असल्याचा भारतीय क्रिकेटमधला हा एक दुर्मिळ योग आहे. या तिघांशिवाय पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर हे दोन मुंबईकर देखील भारतीय टीमचे सदस्य आहेत. रोहितची निवड पक्की! रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुरुवातीला येऊ शकला नव्हता. त्यानंतर बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला. सिडनीमध्ये 14 दिवसांचा क्वारंटाईम कालावधी पूर्ण केल्यानंतर तो 30 डिसेंबरला मेलबर्नमध्ये टीममध्ये दाखल झाला. रोहितची उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानं तो आता सिडनी टेस्ट खेळणार हे नक्की आहे. मयंक अग्रवाल किंवा हनुमा विहारी यापैकी एकाच्या जागेवर रोहितची टीममध्ये निवड होणार आहे. मेलबर्न टेस्टमध्ये जखमी झालेल्या उमेश यादवच्या जागी टी. नटराजनची उर्वरित दोन टेस्टसाठी टीममध्ये निवड झाली आहे. टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेट किपर) ऋषभ पंत (विकेट किपर), जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, टी. नटराजन
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Mumbai

    पुढील बातम्या