Home /News /sport /

IND vs AUS: जागा 1 फलंदाज 3! ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखर धवनसोबत कोणाला उतरवणार विराट?

IND vs AUS: जागा 1 फलंदाज 3! ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखर धवनसोबत कोणाला उतरवणार विराट?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीला उतरवण्यासाठी भारताकडे एक, दोन नाही तर 4 खेळाडू आहे. यात शिखर धवन एक सलामीचा फलंदाज असेल, मात्र त्याच्याबरोबर विराट कोणाला उतरवणार हा पेच कायम आहे.

    सिडनी, 23 नोव्हेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र एकदिवसीय सामन्यासाठी विराट कोणत्या खेळाडूंची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीला उतरवण्यासाठी भारताकडे एक, दोन नाही तर 4 खेळाडू आहे. यात शिखर धवन एक सलामीचा फलंदाज असेल, मात्र त्याच्याबरोबर विराट कोणाला उतरवणार हा पेच कायम आहे. संघात सध्या मयंक अग्रवाल, शुभमन गिल आणि केएल राहुल असे तीन पर्याय आहेत. केएल राहुलला संघात विकेटकीपर फलंदाज म्हणून घेण्यात आले असल्यामुळे तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मयंक अग्रवाल, शुभमन गिल यांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही खेळाडूंकडे एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव कमी आहे. मात्र आयीएलमधली मयंकला फॉर्म पाहता, त्याला संघात जागा मिळण्याची शक्यता जास्त आहे. याआधी भारतानं वर्षभरापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली होती. यात भारताला 3-0नं पराभव सहन करावा लागला होता. वाचा-IND vs AUS : स्मिथसमोर ती चूक करू नका, ऑस्ट्रेलियाचा भारतीय बॉलरना इशारा पिच पाहून घेणार निर्णय मयंकनं न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघात सामिल होता, मात्र त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री सिडनी क्रिकेट पिच आणि ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पाहून संघाची निवड करतील. सध्या दोन्ही फलंदाज कसून सराव करत आहेत. शुभमन आणि मयंकचे रेकॉर्ड शुभमन आणि मयंकचा सध्याचा फॉर्म सारखा आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना गिलनं 440 धावा केल्या. तर मयंकनं 418 धावा केल्या. भारतीय संघ 8 खेळाडूंचे स्थान पक्कं आहे. यात धवन, कर्णधार कोहली, श्रेयस अय्यर, विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह यांचे नाव आहे. जलद गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल. वाचा-IND vs AUS : ...तर रोहितचं खेळणं कठीण, रवी शास्त्रींनी व्यक्त केली चिंता भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: India vs Australia, Virat kohli

    पुढील बातम्या