मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : टेनिस बॉल क्रिकेट ते टेस्ट, 50 दिवसात बदललं नशीब!

IND vs AUS : टेनिस बॉल क्रिकेट ते टेस्ट, 50 दिवसात बदललं नशीब!

नटराजन आणि सुंदर हे दोघं टेस्टच्या एका इनिंगमध्ये तीन विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या दोघांनी त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहेत हा विक्रम आहे.

नटराजन आणि सुंदर हे दोघं टेस्टच्या एका इनिंगमध्ये तीन विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या दोघांनी त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहेत हा विक्रम आहे.

नशीब बदलायला फार वेळ लागत नाही, असं म्हणतात. भारताचा फास्ट बॉलर टी. नटराजन (T Natrajan) याच्याबाबतीही असंच काहीस घडलं आहे. 50 दिवसांपूर्वी प्रकाशझोतापासून लांब असणाऱ्या नटराजन याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

ब्रिस्बेन, 15 जानेवारी : नशीब बदलायला फार वेळ लागत नाही, असं म्हणतात. भारताचा फास्ट बॉलर टी. नटराजन (T Natrajan) याच्याबाबतीही असंच काहीस घडलं आहे. 50 दिवसांपूर्वी प्रकाशझोतापासून लांब असणाऱ्या नटराजन याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये नटराजनची निवड झाली आहे. भारताकडून टेस्ट खेळणारा तो 300 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

टी नटराजन याची कहाणी एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशीच आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याची टी-20 स्पेशलिस्ट म्हणून टीममध्ये निवड झाली. टी-20 सीरिजमध्येही त्याचं खेळणं निश्चित नव्हतं, पण खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्याला वनडे सीरिजमध्ये संधी मिळाली. 2 डिसेंबर 2020 साली कॅनबेरामध्ये नटराजन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच वनडेमध्ये त्याने दोन विकेट घेऊन छाप पाडली. यानंतर त्याने टी-20 सीरिजच्या तीनही मॅच खेळल्या. टी-20 सीरिजमध्ये 6 विकेट घेत नटराजन यशस्वी बॉलर ठरला. त्याचा इकोनॉमी रेटही फक्त 6.91 होता.

नेट बॉलर झाला टेस्ट क्रिकेटर

वनडे आणि टी-20 सीरिजनंतर नटराजनला नेट बॉलर म्हणून टीमसोबत ठेवण्यात आलं होतं. नटराजन रोज भारतीय बॅट्समनना नेटमध्ये सराव देत होता. पण चौथ्या टेस्टपर्यंत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, अश्विन आणि जडेजा हे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले, त्यामुळे नटराजनला पदार्पणाची संधी मिळाली.

नटराजनची कहाणी

तामीळनाडूचं छोटं गाव असलेल्या चिन्नापाम्पट्टीमध्ये नटराजनचा जन्म झाला. आईने मोल-मजुरी करून नटराजनला लहानाचं मोठं केलं. टेनिस बॉलने क्रिकेट खेळताना प्रशिक्षक जयप्रकाश यांनी त्याला पाहिलं, यानंतर त्याला तामीळनाडू प्रीमियर लीग खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेच्या जोरावर नटराजन आयपीएलमध्येही खेळू लागला. आयपीएलमधल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचं भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

First published: