IND vs AUS : टीम इंडियाने दिलेल्या गिफ्टमुळे लायन भारावला, रहाणेला म्हणाला Thank You!

IND vs AUS : टीम इंडियाने दिलेल्या गिफ्टमुळे लायन भारावला, रहाणेला म्हणाला Thank You!

ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायन (Nathan Lyon) याने भारतीय टीमचे (Team India) आभार मानले आहेत. ब्रिस्बेनमध्ये 100वी टेस्ट खेळणाऱ्या लायनला भारतीय टीमने जर्सी भेट दिली.

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायन (Nathan Lyon) याने भारतीय टीमचे (Team India) आभार मानले आहेत. ब्रिस्बेनमध्ये 100वी टेस्ट खेळणाऱ्या लायनला भारतीय टीमने जर्सी भेट दिली. या जर्सीवर टीम इंडियाच्या सगळ्या क्रिकेटपटूंनी सही केली होती. टीम इंडियाच्या या गिफ्टमुळे नॅथन लायन भारावून गेला. ऑस्ट्रेलियाकडून 100 टेस्ट खेळण्याचा रेकॉर्ड करणारा लायन 13वा खेळाडू आहे.

भारतीय टीमची ऑटोग्राफ असलेली जर्सी लायनने इन्स्टाग्रामवर शेयर केली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकल्याबद्दल लायनने टीम इंडिया आणि अजिंक्य रहाणेचे आभार मानले आहेत. 'ऑस्ट्रेलियाकडून खेळणं आणि बॅगी ग्रीन मिळवणं, माझ्यासाठी कायमच स्वप्न होतं. ऑस्ट्रेलियाच्या महान क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची आणि शिकण्याची संधी मला मिळाली. काही माणसं भेटली, जे आयुष्यभर मित्र राहतील. 100 वी मॅच खेळणं माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. आम्हाला पाहिजे तसा निकाल लागला नाही, पण शिकणं कायम ठेवेन. आणखी चांगला क्रिकेटपटू व्हायचं माझं लक्ष्य आहे. सीरिज जिंकणाऱ्या टीम इंडिया आणि अजिंक्य रहाणेचं अभिनंदन. तुमची खिलाडूवृत्ती आणि ऑटोग्राफवाल्या जर्सीसाठी धन्यवाद,' अशी पोस्ट लायनने केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Nathan Lyon (@nath.lyon421)

नाथन लायन 100वां टेस्ट खेलने वाले 13वें ऑस्ट्रेलियाई खिलाड़ी हैं. (फोटो साभार-nath.lyon421)

लायनसाठी भारताविरुद्धची सीरिज निराशाजनक राहिली. चार टेस्टमध्ये त्याला फक्त 9 विकेट घेता आल्या. त्याने आपल्या टेस्ट करियरमध्ये 399 विकेट घेतल्या आहेत. शेन वॉर्न (708) आणि ग्लेन मॅक्ग्रा (563) यांच्यानंतर लायन ऑस्ट्रेलियाचा तिसरा यशस्वी टेस्ट बॉलर आहे. लायनची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड झाली आहे. या सीरिजमध्ये त्याला 400 विकेटचा टप्पा ओलांडण्याची संधी आहे. हा रेकॉर्ड करणारा तो जगातला 16 वा बॉलर होईल.

Published by: Shreyas
First published: January 28, 2021, 2:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या