INDvsAUS : भारताला मोठा धक्का, पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित आऊट

INDvsAUS : भारताला मोठा धक्का, पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित आऊट

हा सामना जिंकून 2-0 ने आघाडी मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

  • Share this:

नागपूर, 5 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का बसला आहे. सलामीवीर रोहित शर्मा खातं न उघडताच बाद झाला आहे.

पहिला सामना गमावल्यानंतर मालिकेत पुनरागमन करण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. तर हा सामना जिंकून 2-0 ने आघाडी मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, नागपूरचं व्हीसीए मैदान भारतासाठी नेहमीच फलदायी ठरलं आहे. इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. दुसरीकडे, कांगारूंच्या नावावर या मैदानात केवळ एका विजयाची नोंद आहे. 2011 साली विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.

महेंद्रसिंह धोनीसाठी हे मैदान लकी ठरलं आहे, असं म्हणता येईल. कारण या मैदानात सर्वाधिक 268 धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. तसंच इथं धोनीनं दोन शतकंही झळकावली आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात काय झालं?

केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनीच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारताने पराभवाचा वचपा काढत आॅस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला. केदार आणि धोनीने अर्धशतकी खेळी करून पहिला एकदिवसीय सामना खिशात घातला.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.आॅस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 237 धावांचा आव्हान ठेवले होते. 237 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची मात्र, निराशाजनक सुरुवात राहिली. शिखर धवन भोपळाही न फोडता झटपट बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने फटकेबाजी सुरूच ठेवली. परंतु, रोहित शर्माचा आज करिश्मा चालला नाही. 66 चेंडूचा सामना करत तो 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि धोनीने टीमची कमान सांभाळली. परंतु, विराटही 44 धावा करून माघारी परतला. अवघ्या 6 धावांनी विराटचे अर्धशतक हुकले. त्यानंतर आलेल्या केदार जाधवने तरच खरी कमाल केली. सहा क्रमांकावर उतरून केदारने विजयाचा रथ अक्षरश: खेचून आणला. केदारने 87 चेंडूचा सामना करत 1 षटकार आणि 9 चौकार लगावत निर्णयाक 81 धावा केल्यात. धोनी आणि केदारच्या धडाकेबाज भागिदारीच्या बळावर भारताने 49 व्या षटकात 240 धावा करून सामना जिंकला. विशेष म्हणजे, आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये धोनीचे विनिंग षटकार नाही पण चौकार लगावत विजयावर मोहोर उमटवली.

VIDEO : पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची कपडे फाटेपर्यंत धुलाई

First published: March 5, 2019, 1:05 PM IST

ताज्या बातम्या