VIDEO VIRAL : मैदानात घुसलेल्या फॅनची धोनीने घेतली अशी फिरकी; विराटही राहिला बघत!

VIDEO VIRAL : मैदानात घुसलेल्या फॅनची धोनीने घेतली अशी फिरकी; विराटही राहिला बघत!

नागपूरमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय टीम क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आली आणि पाठोपाठ एक माणूसही आत घुसला.

  • Share this:

नागपूर, 5 मार्च : क्रिकेट असो वा सिनेमा या क्षेत्रातल्या स्टारना फॅन मोमेंट्सचा अनुभव नेहमीच होत असतो. गेल्या काही दिवसात क्रिकेट मॅचच्या आधी किंवा नंतर सुरक्षा कवच भेदून क्रिकेट फॅन्स त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटायला जात असल्याचा अनुभव आला आहे. असा ताजा अनुभव आला महेंद्रसिंह धोनीला. नागपूरमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय टीम क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आली आणि पाठोपाठ एक माणूसही आत घुसला.

धोनीने मात्र आपल्या कूल शैलीत आपल्या फॅनचीही फिरकी घेतली. आपल्याला भेटायला हा फॅन येतोय हे बघून धोनी चक्क धावत सुटला. पकडा पकडीच्या खेळासारखा इतर खेळाडूंमधून धावत हा फॅन अखेर धोनीला भेटला. धोनीने आपल्या फॅनची गंमत करायची संधी सोडली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीचा एक फॅन सुरक्षा व्यवस्था भेदून त्याला भेटायला थेट पीचपर्यंत धावत आला होता. हे फॅन सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असतात.
दरम्यान भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने उभं केलेलं 250 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ही बातमी प्रकाशित करेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 30 षटकांत 4 बाद 136 धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या