अखेर महेंद्रसिंग धोनीची टीम इंडियात 'घरवापसी'!

अखेर महेंद्रसिंग धोनीची टीम इंडियात 'घरवापसी'!

हार्दिक पांड्याला संधी देऊन ऋषभ पंतला बाहेर बसवण्यात आलं आहे

  • Share this:

24 डिसेंबर : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची बीसीसीआयने घोषणा केली आहे. महेंद्र सिंग धोनीची आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तसंच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सामन्यातही धोनीला संधी देण्यात आली आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यात टी-20 मालिकेत धोनीला बाहेर बसवण्यात आलं होतं. त्याचबरोबर आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतही धोनीला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे धोनीचं क्रिकेट करिअर संपलं की काय अशी चर्चा रंगली होती. परंतु, आज सोमवारी बीसीसीआयनं या चर्चांना पूर्णविराम लगावत धोनीला भारतीय टीममध्ये पुन्हा खेळण्यासाठी संधी दिली आहे.

याशिवाय हार्दिक पांड्यालाही संधी देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला संधी देऊन ऋषभ पंतला बाहेर बसवण्यात आलं आहे. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून पंतला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पंतची 2019 च्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. एकदिवसीय सामन्यातून पंतला जरी वगळण्यात आलं असलं तरी टी-20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. मात्र, धोनी आणि कार्तिक असल्यामुळे पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार हे सांगणं अवघड आहे.

वेस्ट इंडीज आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत चांगली कामगिरी न करणाऱ्या क्रुणाल पांड्याला न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका ही पुढील वर्षी जानेवारीमध्ये खेळवण्यात येणार आहे. 3 सामन्याची ही एकदिवसीय मालिका आहे. पहिला सामना हा 12 जानेवारीला सिडनी, दुसरा सामना 15 जानेवारीला अॅडलेड आणि तिसरा सामना हा 18 जानेवारीला मेलबर्न इथं खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासासाठी रवाना होईल.

न्‍यूझीलंड दौऱ्यासाठी अशी आहे टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि खलील अहमद

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी अशी असेल टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलिल अहमद आणि मोहम्मद शमी

====================

First published: December 24, 2018, 6:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading