सिडनी, 8 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली सिडनी टेस्ट सुरू होण्याआधी मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) भावुक झाला. स्टेडियममध्ये राष्ट्रगीत सुरू झालं, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. मोहम्मद सिराजने त्याला रडू कोसळण्याचं कारण सांगितलं आहे. राष्ट्रगीत सुरू असताना मला वडिलांची आठवण आली, असं सिराज म्हणाला. 'त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर वडिल आले. त्यांना मला टेस्ट क्रिकेट खेळताना बघायचं होतं. त्यांनी मला भारतासाठी खेळताना पाहिलं असतं, तर मला खूप आनंद झाला असता,' अशी प्रतिक्रिया सिराजने दिली.
ऑस्ट्रेलिया दौरा सुरू व्हायच्या काही दिवस आधी मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं, पण सिराजने भारतात न परतता टीमसोबत ऑस्ट्रेलियात राहायचा कठीण निर्णय घेतला.
#AUSvIND pic.twitter.com/4NK95mVYLN
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2021
सिडनीची खेळपट्टी बॅटिंगसाठी चांगली
सिडनीची खेळपट्टी बॅटिंगसाठी चांगली असल्याचं मत मोहम्मद सिराजने मांडलं आहे. 'ही खेळपट्टी खूप सपाट आहे. आमची योजना जास्त काही करण्यापेक्षा दबाव टाकण्यावर होती, कारण बॅट्समनसाठी ही खेळपट्टी सोपी आहे. मागच्या मॅचच्या तुलनेत या मॅचमध्ये बाऊन्सरही प्रभावी ठरत नाहीये. पण टेस्ट क्रिकेटमध्ये सगळं संयमावर अवलंबून असतं,' असं सिराज म्हणाला.
पुकोवस्कीला आम्ही जाणूनबुजून बाऊन्सर टाकल्याचं सिराजने सांगितलं. त्याला बाऊन्सर टाकून हैराण करण्याची आमची रणनीती होती, असं सिराज म्हणाला. आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या नवदीप सैनीने पुकोवस्कीला आऊट केलं. मी आणि सैनीने भारत ए साठी खूप मॅच खेळल्या आहेत, त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. आपण स्थानिक क्रिकेटमध्ये जे करतो तेच इकडे कर, असा सल्ला मी सैनीला दिल्याचं सिराजने सांगितलं.
ऋषभ पंत याने दोनवेळा पुकोवस्कीचे कॅच सोडले, याबाबतही सिराजला प्रश्न विचारण्या आला. हा खेळाचा भाग आहे, ज्यावेळी असं होतं तेव्हा बॉलर म्हणून तुम्ही निराश होता. पण तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे पुढच्या ओव्हरवर लक्ष देणं जास्त महत्त्वाचं असतं, अशी वक्तव्य सिराजने केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.