मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ...म्हणून सिराज ऑस्ट्रेलियात चमकला, लॉकडाऊनमध्ये घरात केलं हे काम

IND vs AUS : ...म्हणून सिराज ऑस्ट्रेलियात चमकला, लॉकडाऊनमध्ये घरात केलं हे काम

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीमने (India vs Australia) ऐतिहासिक कामगिरी करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मध्ये 2-1 ने विजय मिळवला. आपली पहिलीच टेस्ट सीरिज खेळणाऱ्या मोहम्मद सिराज (Mohamad Siraj) याने धमाकेदार कामगिरी केली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीमने (India vs Australia) ऐतिहासिक कामगिरी करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मध्ये 2-1 ने विजय मिळवला. आपली पहिलीच टेस्ट सीरिज खेळणाऱ्या मोहम्मद सिराज (Mohamad Siraj) याने धमाकेदार कामगिरी केली. सीरिजमध्ये 13 विकेट घेणारा मोहम्मद सिराज भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. भारताने लागोपाठ दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच जमिनीवर पराभव केला, यामध्ये सिराजने मोलाची भूमिका बजावली. सिराजने लॉकडाऊनमध्येच आयपीएल 2020 आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरू केली होती. कोरोना व्हायरसमुळे भारतीय टीम जवळपास 6 महिने क्रिकेटपासून लांब होती, पण तरीही सिराजने त्याचा सराव सुरूच ठेवला होता. लॉकडाऊनदरम्यान सिराजने आपल्या बॉलिंगमध्ये सुधारणा केली. लॉकडाऊनमध्ये लाईन-लेंथमध्ये सुधारण्यासाठी आपण एकाच स्टम्पवर बॉलिंग करण्याचा सराव केला, याचा फायदा आयपीएल आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाला, असं सिराज म्हणाला. आपली पहिलीच टेस्ट सीरिज खेळणाऱ्या सिराजने दिग्गजांच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय बॉलिंगचं नेतृत्व केलं. टीमने दाखवलेला विश्वासही सिराजने सार्थ ठरवला. 'हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा मोसम असेल, हे मला माहिती होतं. कारण मागच्यावर्षी माझी कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मी खूप मेहनत घेतली. एकच स्टम्प ठेवून मी बॉलिंगचा सराव केला,' अशी प्रतिक्रिया सिराजने दिली. आयपीएल 2020 मध्ये सिराजने एकाच स्पेलमध्ये दोन मेडन ओव्हर टाकल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच बॉलर ठरला. आयपीएलमध्ये मिळालेल्या यशाचं श्रेय सिराजने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ला दिलं आहे. 'माझ्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता असल्याचं विराटने मला सांगितलं. त्याने मला वारंवार लाईन-लेन्थवर बॉलिंग करण्याचा सल्ला दिला. त्याआधी मी स्वत:वरच खूप दबाव टाकला होता, पण या मोसमात मी कोणताही दबाव न घेता बॉलिं केली,' असं वक्तव्य सिराजने केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्याआधीच मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं होतं, पण त्याने घरी न परतता टीमसोबतच राहण्याचा कठीण निर्णय घेतला. मी भारताकडून टेस्ट खेळावं, हे वडिलांचं स्वप्न होतं, हे स्वप्न पूर्ण होताना पाहण्यासाठी ते आज हवे होते, अशी भावनिक प्रतिक्रिया सिराजने दिली. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टच्या ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या इनिंगमध्ये सिराजने 5 विकेट घेतल्या, ज्यामुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या