Home /News /sport /

IND vs AUS : पराभवानंतर मॅथ्यू वेडचा रडीचा डाव! DRS वर केली टीका

IND vs AUS : पराभवानंतर मॅथ्यू वेडचा रडीचा डाव! DRS वर केली टीका

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी पराभव केला आहे. पण या पराभवांनंतर ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने ऑस्ट्रेलियन कॅप्टन टीम पेन (Tim Paine) याच्या विकेटवरून टीका केली आहे.

पुढे वाचा ...
मेलबर्न, 29 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी पराभव केला आहे. या सामन्यावर सुरुवातीपासूनच भारतीय टीमने पकड मिळवली होती. ती शेवटच्या क्षणापर्यंत तशीच ठेवत ऑस्ट्रेलियाला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन टीमची इनिंग अवघ्या 200 रनमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 70 रन 2 विकेट्स गमावत पूर्ण केल्या. पण या पराभवांनंतर ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने ऑस्ट्रेलियन कॅप्टन टीम पेन (Tim Paine) याच्या विकेटवरून टीका केली आहे. मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने टीका करताना चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याचे उदाहरण दिले. चेतेश्वर पुजारा आणि टीम पेन या दोघांच्याही विकेटमध्ये साम्य असल्याचे त्याने म्हटले. टीम पेन (Tim Paine) याच्या बॅटची कडा घेत बॉल विकेटकीपर ऋषभ पंतकडे गेला. त्याने अपील केलं असता अंपायरने त्याला नॉटआउट दिलं. त्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने डीआरएस घेतला. त्यामध्ये पेन आउट असल्याचं स्पष्ट झालं. पण याच निर्णयावरून मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने टीका करत डीआरएसमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. त्यामुळे पुन्हा एकदा डीआरएसच्या (DRS) पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वेडने पुजारा याच्या विकेटविषयी बोलताना, पुजारा याच्या बॅटने बॉलची कड घेतली होती. मी स्लिपमध्ये उभा असल्याने मला स्पष्टपणे ऐकू आलं होतं. पण त्याला आउट दिलं गेलं नाही. त्यामुळे एका खेळाडूला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा असं होत असल्याचा आरोप त्याने केला. दरम्यान, या टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर चार टेस्टच्या मालिकेत ऑस्ट्रलियन टीम आणि भारतीय टीमने प्रत्येकी एक सामना जिंकत बरोबरी साधली असून उर्वरित 2 टेस्ट मॅचमध्ये विजयासाठी दोन्ही टीम जोर लावणार आहेत. या सीरिजमध्ये उर्वरित टेस्टमध्ये इंडियन टीम कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
First published:

पुढील बातम्या