मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: गुड न्यूज... 9.30 वाजता सुरु होणार मॅच, पाहा किती ओव्हरचा होणार सामना?

Ind vs Aus: गुड न्यूज... 9.30 वाजता सुरु होणार मॅच, पाहा किती ओव्हरचा होणार सामना?

भारत वि. ऑस्ट्रेलिया

भारत वि. ऑस्ट्रेलिया

Ind vs Aus: मैदानाचा एक भाग ओला असल्यानं खेळाडूंना खेळताना दुखापत होण्याची शक्यता असल्यानं अम्पायर्सनी सावध भूमिका घेतली होती. पण परिस्थिती सुधारल्यानं खेळ सुरु होण्याबाबत निर्णय दिला आहे.

    नागपूर, 23 सप्टेंबर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातला दुसरा टी20 सामना आज नागपुरात खेळवण्यात येतोय. पण ओल्या आऊटफिल्डमुळे हा सामना नियोजित वेळेत सुरु झाला नाही. मात्र हा सामना साडे नऊ वाजता सुरु करण्याचा निर्णय अम्पायर्सनी घेतला आहे. त्यासाठी 9.15 वाजता नाणेफेक करण्यात आली त्यावेळी टीम इंडियानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला असून भारतीय संघात त्यानं दोन बदल केले आहेत. या सामन्यासाठी रोहितनं उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारला वगळलं आहे. तर रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराचं कमबॅक झालं आहे. भारतीय संघ - रोहित, विराट, सूर्यकुमार, लोकेश राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, 8-8 ओव्हरचा सामना अम्पायर्सनी सांगितल्याप्रमाणे हा सामना 8-8 ओव्हरचा होणार आहे. तर दोन ओव्हरचा पॉवरप्ले असेल. चार वेळा पाहणी दरम्यान या मॅचमध्ये आतापर्यंत चार वेळा अम्पायर्सनी मैदानाची पाहणी केली. आऊटफिल्ड ओली असल्यानं 6.30 वाजता होणारी नाणेफेक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सात वाजता अम्पायर्सनी दुसऱ्यांदा मैदानाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी आणखी एक तास उशीरानं पाहणी करणार असल्याचं सांगितलं. अखेर अम्पायर्सनी 8.45 वाजता शेवटची पाहणी करुन खेळ सुरु होणार असल्याची घोषणा केली. मालिकेत ऑस्ट्रेलिया आघाडीवर मोहालीत झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं 209 धावांचं विशाल लक्ष्य उभारुनही ऑस्ट्रेलियानं 4 विकेट्सनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे नागपूरमधली दुसरी लढत टीम इंडियासाठी निर्णायक ठरणार आहे. भारताला या मालिकेतलं आव्हान राखायचं असेल तर जिंकणं गरजेचं आहे.
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Cricket, Sports

    पुढील बातम्या