IND vs AUS : आता कशी आहे बुमराहची तब्येत? हॉटेलमधली Inside Story

IND vs AUS : आता कशी आहे बुमराहची तब्येत? हॉटेलमधली Inside Story

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्ट आधी भारतीय टीमला (India vs Australia) दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. या टेस्टमध्ये फिट 11 खेळाडू उतरवण्याचं आव्हान अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)पुढे असणार आहे.

  • Share this:

ब्रिस्बेन, 13 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्ट आधी भारतीय टीमला (India vs Australia) दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. या टेस्टमध्ये फिट 11 खेळाडू उतरवण्याचं आव्हान अजिंक्य रहाणेपुढे असणार आहे. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) आधीच सीरिजमधून बाहेर झाले आहेत, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचं खेळणंही जवळपास अशक्य आहे. बीसीसीआयने बुमराहच्या दुखापतीवर अधिकृत माहिती दिलेली नाही, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमराहची दुखापत गंभीर आहे. पोटाला झालेल्या दुखापतीमुळे बुमराहला सोमवारी चालताही येत नव्हतं.

सिडनी टेस्टच्या शेवटच्या दिवशीही भारताचे अनेक खेळाडू पेन किलर घेऊन मैदानात उतरले होते. त्यामुळे टीम प्रशासनाची चिंता आता वाढली आहे. तिसऱ्या टेस्टमध्येच बुमराहला त्रास होत होता, पण तरीही तो खेळत राहिला, आता मात्र त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे, असं टीम इंडियाच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे.

'बुमराहला खेळवण्याचा निर्णय घेणं कठीण दिसत आहे, कारण सोमवारी त्याला चालताही येत नव्हतं. जर तो फिट झाला तर तो चमत्कारच असेल,' असं सूत्राचं म्हणणं आहे. पुढच्याच महिन्यापासून इंग्लंडविरुद्धच्या सीरिजला भारतात सुरूवात होणार आहे, त्यामुळे टीम प्रशासन बुमराहला खेळण्याचा धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे. तसंच चौथ्या टेस्टमध्ये बुमराहला खेळवलं आणि तो अर्ध्या मॅचमध्येच अनफिट झाला, तर काय करायचं? असा प्रश्नही सूत्राने विचारला आहे.

खेळाडूंना होत असलेल्या दुखापती पाहता खेळाडूंचा नेट सरावही बंधनकारक नाही, तसंच जिममध्येही त्यांना जास्त व्यायाम करता येणार नाही.

दुखापत झालेले खेळाडू

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये मोहम्मद शमी, उमेश यादव, रविंद्र जडेजा, हनुमा विहारी, केएल राहुल हे या दौऱ्यातून आधीच बाहेर झाले आहेत. तर सिडनी टेस्टमध्ये ऋषभ पंतच्या कोपराला दुखापत झाली आणि आर.अश्विन पाठीची दुखापत घेऊन खेळत होता. नेटमध्ये सराव करत असताना मयंक अगरवाल यालाही दुखापत झाली आहे. इशांत शर्माला आयपीएल सुरू झाल्यावरच दुखापत झाल्यामुळे तो या दौऱ्यावर येऊ शकला नाही.

Published by: Shreyas
First published: January 13, 2021, 11:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading