मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : या खेळाडूने दिली ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर खेळवण्याची 'आयडिया'!

IND vs AUS : या खेळाडूने दिली ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर खेळवण्याची 'आयडिया'!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताने (India vs Australia) ऐतिहासिक कामगिरी करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर 2-1 ने कब्जा केला. ऋषभ पंत (Rishabh Pant) हा ब्रिस्बेन टेस्टमधल्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 26 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताने (India vs Australia) ऐतिहासिक कामगिरी करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर 2-1 ने कब्जा केला. ऋषभ पंत (Rishabh Pant) हा ब्रिस्बेन टेस्टमधल्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या ऋषभ पंतने नाबाद 89 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 328 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पंतला पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने ऋषभ पंतला वरच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याचा सल्ला दिला होता, अशी प्रतिक्रिया भारताचे बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी दिली.

ऍडलेडमधल्या पहिल्या टेस्टनंतर पितृत्वाच्या रजेमुळे विराट कोहली सीरिज अर्धवट सोडून भारतात परतला. यानंतर अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. अजिंक्य रहाणेनेही खेळाडूंच्या दुखापतींच्या अडचणींवर मात करत ऐतिहासिक कामगिरी केली. विक्रम राठोड यांनी अश्विनसोबत त्याच्या युट्यूब चॅनलवर चर्चा केली. विराट परतल्यानंतर टीम इंडियाने पुनरागमनाची रणनीती बनवल्याचं राठोड म्हणाले.

'पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर या सगळ्याची सुरूवात झाली. विराटने भारतात जाण्याआधी अजिंक्य रहाणेसोबत चर्चा केली होती. ऋषभला पाचव्या क्रमांकावर पाठवण्याची कल्पना विराटची होती. कारण डाव्या आणि उजव्या बॅट्समनमुळे संतुलन मिळतं, असं विराट म्हणाला होता. गाबाच्या निर्णायक टेस्टआधी पंतच्या बॅटिंग क्रमांकाबाबत चर्चा झाली,' अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.

1988 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा गाबाच्या मैदानात पराभव झाला आहे. पहिले ड्रॉसाठी खेळायचं आणि मग विजयासाठी जायचं, हाच आमचा प्रयत्न होता. त्याचवेळी पंतला पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. रवी शास्त्रींसह सगळे जण यासाठी सहमत होते. ऑस्ट्रेलियाने डावखुऱ्या बॅट्समनना चांगली बॉलिंग केली नाही, असं वक्तव्य विक्रम राठोड यांनी केलं.

First published: