टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्स राखून विजय

टी-20 सामन्यात  भारताचा ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्स राखून विजय

वनडे मालिका खिश्यात घातल्यानंतर टी-20 सामन्यातही भारताने विजयाची परंपरा कायम राखलीये.

  • Share this:

07 आॅक्टोबर : वनडे मालिका खिश्यात घातल्यानंतर टी-20 सामन्यातही भारताने विजयाची परंपरा कायम राखलीये. पहिल्या टी-20 सामन्यात विजयी सलामी देत भारताने आॅस्ट्रेलियावर 9 विकेटने पराभव केलाय.

झारखंड क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने टाॅस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आॅस्ट्रेलियन टीम 119 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र पावसाच्या व्यत्यामुळे सामना थांबला होता. डर्कवर्थ लुईस नियमानुसार नंतर हा सामना पुन्हा खेळवण्यात आला. तेव्हा भारताला 6 ओव्हरर्समध्ये 48 रन्सचं माफक आव्हान देण्यात आलं. 11 रन्स करून रोहित शर्मा आऊट झाल. पण विराट कोहली आणि शिखर धवनने माफक आव्हान 4.1 ओव्हरर्समध्ये पूर्ण करून भारताला विजय मिळवून दिला.  भारताने वनडे सिरीजमध्ये आॅस्ट्रेलियाला 4-1 ने मात दिलीये. आता टी-20 सिरीजमध्ये 1-0ने आघाडी घेतलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 11:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading