ब्रिस्बेन, 16 जानेवारी : टी.नटराजन (T Natrajan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या दोन खेळाडूंनी शुक्रवारी भारताकडून टेस्ट क्रिकेटमधून पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs Australia) हे दोघं मैदानात उतरले. चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने तब्बल 20 क्रिकेटपटूंना संधी दिली, हा 143 वर्षांच्या क्रिकेट इतिहासातला विक्रम आहे.
20 खेळाडूंना एका सीरिजमध्ये वापरणं ही भारतीय टीमची रणनीती नसून मजबुरीच होती, कारण खेळाडूंना दुखापत झाली. 143 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमने एवढ्या खेळाडूंना मैदानात उतरवलं. याआधी हे रेकॉर्ड इंग्लंडच्या नावावर होता. 2013-14 साली ऍशेस सीरिजमध्ये इंग्लंडने 18 खेळाडू मैदानात उतरवले होते.
भारताने पहिली टेस्ट मॅच 1932 साली खेळली होती. नटराजन भारतासाठी टेस्ट खेळणारा 300 वा आणि वॉशिंग्टन सुंदर 301 वा खेळाडू आहे. जगातली पहिली टेस्ट 1877 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 2404 टेस्ट मॅच झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये खेळलेले खेळाडू
पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, टी नटराजन, केएल राहुल, ऋद्धीमान साहा, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.