मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /...तर शुभमन गिलचं करियर धोक्यात, समोर आली मोठी चूक

...तर शुभमन गिलचं करियर धोक्यात, समोर आली मोठी चूक

आपली पहिलीच टेस्ट सीरिज खेळणाऱ्या शुभमन गिल (Shubhaman Gill) याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) धमाकेदार कामगिरी केली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या खराब कामगिरीनंतर शुभमन गिलला संधी देण्यात आली.

मुंबई, 26 जानेवारी : आपली पहिलीच टेस्ट सीरिज खेळणाऱ्या शुभमन गिल (Shubhaman Gill) याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) धमाकेदार कामगिरी केली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या खराब कामगिरीनंतर शुभमन गिलला संधी देण्यात आली. यानंतर गिलने तीन टेस्ट मॅचमध्ये दोन अर्धशतकं करत 259 रन केले. ब्रिस्बेन टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये 91 रनची खेळी करून गिलने भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाचं योगदान दिलं. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियात कौतुकास्पद कामगिरी केली असली, तरी वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयन बिशप (Ian Bishop) यांच्यामते शुभमन गिलच्या बॅटिंग तंत्रामध्ये चुका आहेत.

स्पोर्ट्स स्टारशी बोलताना बिशप म्हणाले, 'शुभमन गिलची बॅटिंग बघायला मस्त वाटत होती. अगदी सहजपणे त्याने शॉट मारले. धीम्या आणि जलद गतीच्या बॉलचा तो सन्मान करत होता, यावरून त्याला क्रिकेटची किती समज आहे हे कळतं. त्याच्या बॅटिंगमध्ये लवचिकता आहे. तसंच तो दिवसेंदिवस खेळ सुधारत आहे.'

'शुभमन गिल प्रत्येक परिस्थितीमध्ये रन करू शकतो. पण त्याच्या बॅटिंग तंत्रामध्ये थोडी कमी आहे, ज्यामुळे मी चिंतेत आहे. लेग स्टम्प आणि लेग साईडच्या बॉलवर तो खूप कमी खेळतो. त्यामुळे फास्ट बॉलर त्याला त्याच ठिकाणी बॉल टाकून बॅटची एज घेऊन कॅच आऊट करण्याचा प्रयत्न करतील,' अशी भीती बिशप यांनी व्यक्त केली.

'शुभमन गिल सेहवागसारखा खेळतो, तो काही वाईट खेळाडू नव्हता. ब्रिस्बेनमध्ये गिल स्टम्पच्या एक्रॉस जाऊन खेळत होता, पण त्याने आपला हात आणि बॅटला शरिरापासून लांब ठेवलं नाही. यावरुन त्याचं किती नियंत्रण आहे, ते समजतं. शुभमन गिलला खूप काही मिळवता येईल. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो मोठा स्कोअर करू शकतो. त्याला स्वत:ला ही गोष्ट माहिती आहे, जर त्याने बॅटिंग तंत्रात सुधारणा केली, तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये रन करू शकतो,' असं बिशप म्हणाले.

First published:
top videos