मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : एका SMS मुळे बदललं अजिंक्य रहाणेचं आयुष्य!

IND vs AUS : एका SMS मुळे बदललं अजिंक्य रहाणेचं आयुष्य!

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आजही 29 डिसेंबर 2013 हा दिवस विसरु शकत नाही. त्या दिवशी डरबनमध्ये (Durban) असलेल्या रहाणेच्या मोबाईलवर डरबनपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुंबईतून एक SMS आला

    मेलबर्न, 27 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात मेलबर्नमध्ये ठसा उमटवला. पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या शतकानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही नाबाद खेळी करत रहाणेने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. फक्त बॅटिंगच नाही तर रहाणेने मैदानात त्याचे नेतृत्व गूणही दाखवले. रहाणेनं पहिल्या दिवशी उत्तम कॅप्टनसी करत ऑस्ट्रेलियाला 195 रन्सवर रोखले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खणखणीत शतक झळकावले. ऑस्ट्रेलियात ‘बॉक्सिंग डे टेस्ट’मध्ये शतक झळकावणारा रहाणे हा सचिन तेंडुलकरनंतरचा (Sachin Tendulkar) दुसरा भारतीय आहे. मुंबईतील मध्यमवर्गीय परिवारातून पुढे आलेल्या रहाणेचं करियर एका SMS मुळे बदललं. खूप कमी लोकांना रहाणेच्या आयुष्यातील ही गोष्ट माहिती आहे. सात वर्षांपूर्वी बदललं आयुष्य अजिंक्य रहाणे आजही 29 डिसेंबर 2013 हा दिवस विसरु शकत नाही. रहाणेनं त्या दिवशी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध डरबन टेस्टमध्ये चांगली बॅटिंग केली. दुर्दैवाने त्याचं शतक फक्त 4 रननं हुकलं. हाता तोंडाशी आलेला शतकाचा घास गिळता आला नाही म्हणून राहणे त्या दिवशी अस्वस्थ होता. त्याचवेळी रहाणेच्या मोबाईलवर डरबनपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुंबईतून एक SMS आला. ‘टेस्ट क्रिकेट काय आहे, शतकाचं मोल काय असतं याची जाणीव आता तुला झाली असेल’, असा तो SMS होता. रहाणेचं आयुष्य त्या SMS नंतर बदललं. ‘सर, मी तुम्हाला शतकासाठी फार वाट पाहायला लावणार नाही.’ असं उत्तर त्याने त्या SMS ला लगेच पाठवलं. रहाणेनं तो शब्द त्याच्या क्रिकेटमधून पाळला. लॉर्ड्स ते मेलबर्न अशा जगातल्या सर्व भागातील स्टेडियमवर त्याने शतक झळकावलं आहे. डरबन टेस्टमध्ये रहाणेचं शतक हुकलं, मात्र त्यानंतर त्याचा खेळ अधिक फोकस झाला. रहाणेला मुंबईमधून तो SMS इतर कुणी नाही तर क्रिकेट विश्वातील सर्वात महान खेळाडू सचिन तेंडुलकरनं पाठवला होता. अजिंक्य रहाणेनं मेलबर्नमध्ये त्याच्या टेस्ट करियमधलं 12 वं शतक झळकावलं. मेलबर्नच्या मैदानावर त्याचं हे दुसरं शतक आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे उर्वरित टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी करत आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला आणि अफगाणिस्तानविरुद्ध बंगळुरु टेस्टमध्ये कॅप्टनसी केली होती. यानंतर मेलबर्न टेस्ट जिंकत रहाणेने त्याचं विजयाचं रेकॉर्ड 100 टक्के कायम ठेवलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या