मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : एक कटू निर्णय, आणि मोहम्मद सिराज लहानाचा मोठा झाला

IND vs AUS : एक कटू निर्णय, आणि मोहम्मद सिराज लहानाचा मोठा झाला

ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होत असतानाच (India vs Australia) भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) वडिलांचं निधन झालं. यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याच्या तयारीमध्ये सिराज होता.

ब्रिस्बेन, 18 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होत असतानाच (India vs Australia) भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) वडिलांचं निधन झालं. यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याच्या तयारीमध्ये सिराज होता. पण कर्णधार विराट कोहली आणि सिराजच्या आईने त्याला ऑस्ट्रेलियातच थांबून देशाचं नावं मोठं करण्याचा सल्ला दिला. वडिलांच्या अंत्यसंस्काराला न जाता ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा कटू निर्णयामुळे सिराजने फक्त देशाचंच नाव मोठं केलं, असं नाही तर तो स्वत:ही या निर्णयामुळे मोठा झाला.

" isDesktop="true" id="514439" >

सोमवारी गाबाच्या मैदानात सिराजचा त्या कटू निर्णयाचे परिणाम आले. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या पाच बॅट्समनना माघारी धाडलं. यानंतर मोहम्मद सिराजला वडिलांची आठवण आली. मुलाने भारताकडून खेळायचं त्यांचं स्वप्न होतं. आता मी भारताकडून खेळत आहे, पण हे बघायला ते नाहीत. वडिल जिवंत असते तर याचा त्यांना नक्कीच आनंद झाला असता. त्यांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत, असं सिराज म्हणाला.

सोमवारी दोन कॅच सोडल्यानंतर सिराजने स्मिथला 55 रनवर आऊट केलं. यानंतर एकाच ओव्हरमध्ये त्याने मार्नस लाबुशेनला 25 रनवर आणि मॅथ्यू वेडला 0 रनवर माघारी धाडलं. मोहम्मद सिराज हा या दौऱ्यातला भारताचा यशस्वी बॉलर ठरला. त्याने 3 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या. भारताचा प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे खेळू शकला नाही, पण त्याच्या गैरहजेरीत सिराजने बॉलिंगचं नेतृत्व केलं. या कामगिरीनंतर बुमराहनेही त्याला मिठी मारली.

First published: